Digambar Aagavane Covid Center was named 'MLA Nilesh Lanke Arogya Mandir'
Digambar Aagavane Covid Center was named 'MLA Nilesh Lanke Arogya Mandir'

दिगंबर आगवणेंच्या कोविड सेंटरला दिले 'आमदार निलेश लंके आरोग्य मंदीर' नाव

राजकारणामध्ये प्रवाह बदलतात तेव्हा परिस्थितीला न डगमगता वाटचाल करत रहायचं. दिगंबर आगवणे हे बिकट परिस्थितीत जनतेचे अश्रू पुसण्यासाठी व आधार देण्यासाठी कायम अग्रणी असतात. त्यामुळे जनता त्यांच्या कार्याची नक्की दखल घेईल व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वासही आमदार लंके यांनी यावेळी व्यक्त केला.

फलटण शहर : महाराष्ट्र ही साधू संतांची पवित्र भूमी आहे. जीवन जगायला पैसे लागत नाहीत. सत्ता व संपत्ती किती कमावली यापेक्षा जीवनात माणसं किती कमावली हे महत्वाचं आहे. कोरोना महामारीत कोरोना बाधितांना मानसिक आधार व जीवदान देण्याचे जे अतिशय महत्वपूर्ण कार्य दिगंबर आगवणे करीत आहेत. ते सद्य परिस्थितीमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, असे मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. 

वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे दिगंबर आगवणे यांनी सुरु केलेल्या कोविड सेंटरचा प्रारंभ आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, कामगार नेते प्रल्हादराव साळूंखे-पाटील, दिगंबर आगवणे, पंचायत समिती सदस्या जयश्री आगवणे, विक्रम भोसले उपस्थित होते. 

सद्याच्या परिस्थितीत मानसिक आधार हेच कोरोना रुग्णांवर प्रभावी औषध आहे, तेच त्यांना कोरोना विरुध्द लढण्याचे आत्मबळ प्राप्त करुन देते असे सांगुन लंके म्हणाले, आयुर हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देण्याचे काम केल्यानंतर आता श्री. आगवणे यांनी सामाजिक जाणिवेतून सर्व सुविधा मोफत पुरविणारे कोरोना केअर सेंटर सुरु केले आहे. मतदारसंघातील माणसांविषयी त्यांच्या ठायी आत्मियता आहे, कष्टकरी व गोरगरीबांसाठी ते नेहमी झटत असतात म्हणूच राजकारण, पक्ष बाजूला ठेवून आपण येथे आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपण सुरु केलेल्या कोविड सेंटरला शरद पवार आरोग्य मंदीर असे नाव का दिले, असा प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो. ज्या वेळी देशावर, राज्यावर संकट आले, त्या वेळी त्या संकटात सर्व प्रथम कोण धावून गेलं असेल तर शरद पवार साहेब होय. ते आमच दैवत आहेत, म्हणूनच ते आमच कोविड सेंटर नसून आरोग्य मंदीर असल्याचे लंके यांनी आवर्जून सांगितले. मी एक भाग्यवान आमदार असून राजकारणामध्ये मला आधार देण्याचे काम शरद पवार, अजितदादा पवार व सुप्रियाताईंनी केल्याचेही त्यांनी नमुद केले. राजकारण अथवा समाजकारण हे ठरवून होत नाही. 

राजकारणामध्ये प्रवाह बदलतात तेव्हा परिस्थितीला न डगमगता वाटचाल करत रहायचं. दिगंबर आगवणे हे बिकट परिस्थितीत जनतेचे अश्रू पुसण्यासाठी व आधार देण्यासाठी कायम अग्रणी असतात. त्यामुळे जनता त्यांच्या कार्याची नक्की दखल घेईल व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वासही आमदार लंके यांनी यावेळी व्यक्त केला. या कोविड केअर सेंटरमध्ये एक हजार बेडचे नियोजन केले असून त्यामधील तीनशे बेड लहान मुलांसाठी राखीव राहणार आहेत.

येथे सर्व सुविधा मोफत पुरविण्यात येणार असून ज्या आमदार लंके यांच्या प्रेरणेतून हे कोविड केअर सेंटर उभे राहिले आहे त्यास आपण 'आमदार निलेश लंके आरोग्य मंदीर' हे नाव देत असल्याचे दिगंबर आगवणे यांनी यावेळी जाहीर केले. प्रारंभी आमदार लंके यांच्या हस्ते कोविड केअरचा शुभारंभ झाला. कार्यक्रमानंतर दिगंबर आगवणे प्रतिष्ठानच्या ॲम्ब्यूलन्सचे लोकार्पणही आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कोविड केअर सेंटर ते फलटण येथील आयुर हॉस्पिटलपर्यंत आमदार निलेश लंके यांनी स्वतः ॲम्ब्यूलन्स चालवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com