धनंजय मुंडेचा संभाजीराजेंना सल्ला : पदासाठी चळवळ नको.... - Dhananjay Munde's advice to Sambhaji Raje: No movement for the post .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

धनंजय मुंडेचा संभाजीराजेंना सल्ला : पदासाठी चळवळ नको....

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 जुलै 2021

मराठा आरक्षणाचा प्रश्न असो की ओबीसी आरक्षणाचा असो, महाविकास आघाडीचे सरकार सक्षमपणे हा विषय न्यायालयात मांडत आहे.

बीड : सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटतात, असे नाही. चळवळ चांगली केली तर त्या माध्यमातून प्रश्न सोडविता येतात. चळवळीत मनातील प्रामाणिकपणा असावा लागतो. केवळ पदासाठी चळवळ करणे कोणाच्याही मनात येऊ नये, असा सल्ला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून दिला. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे इतर वायफळ चर्चेला काहीही अर्थ नाही, असेही त्यांनी नमुद केले. Dhananjay Munde's advice to Sambhaji Raje: No movement for the post ....

मला मुख्यमंत्री करा, बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बीडमध्ये केले होते. यासंदर्भात श्री. मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यातील कोणताही प्रश्न सामान्य असो की असामान्य, तो बहुसंख्य लोकांचा असतो. त्या प्रश्नावर कोणीही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तो प्रश्न सोडवितो असे म्हणणे योग्य नाही. असे कधीच कोणाच्या बाबतीत होत नाही.

हेही वाचा : संभाजीराजे म्हणाले, मला मुख्यमंत्री करा, बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो

मी चळवळीतूनच मोठा झालेला कार्यकर्ता आहे. चळवळ चांगली केली तर त्या माध्यमातून प्रश्न सोडविता येतात. त्यासाठी चळवळ करताना मनात प्रामाणिकपणा असावा लागतो. केवळ पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नयेमराठा आरक्षण प्रश्नाची सुनावणी सहा तारखे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न असो की ओबीसी आरक्षणाचा असो, महाविकास आघाडीचे सरकार सक्षमपणे हा विषय न्यायालयात मांडत आहे. यापुढेही मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी ताकतीने लढणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.   

आवश्य वाचा : बिल्डर अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून पाच तास चैाकशी

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या वादाबाबत ते म्हणाले, विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे याबाबतच्या वायफळ चर्चेला काहीही अर्थ नाही.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख