देवेंद्र फडणवीस उद्या कराड, पाटणला; स्थलांतरीत कुटुंबियांना देणार धीर

सायंकाळी पाच वाजता ते पाटण तालुक्यातील हुंबरळी येथे जाऊन अतिवृष्टीग्रस्त गावांची पहाणी करणार आहेत. तेथून ते पुन्हा कराडला येऊन कृष्णा अभिमत विद्यापीठ कराड येथे मुक्कामी थांबणार आहेत.
देवेंद्र फडणवीस उद्या कराड, पाटणला; स्थलांतरीत कुटुंबियांना देणार धीर
Devendra Fadnavis tomorrow at Karad, Patan; Migrant families will be given patience

सातारा : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (बुधवारी) कराड, पाटणच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते पुरग्रस्त व भूस्खलनग्रस्त गावांना भेटी देऊन पहाणी करणार आहेत. तसेच कोयनानगर येथील स्थलांतरीत केलेल्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना धीर देणार आहेत. Devendra Fadnavis tomorrow at Karad, Patan; Migrant families will be given patience

देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी एक वाजता कृष्णा अभिमत विद्यापीठ कराड येथे आगमन होणार आहे. तेथून ते मोटारीने जाऊन दुपारी पावणे तीन वाजता ते आंबेघर-मोरगिरी येथे जाऊन तेथील पुरग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. तेथून दुपारी सव्वा तीन वाजता ते कोयनानगरकडे जातील. 

कोयनानगर येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरीत केलेल्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ते पाटण तालुक्यातील हुंबरळी येथे जाऊन अतिवृष्टीग्रस्त गावांची पहाणी करणार आहेत. तेथून ते पुन्हा कराडला येऊन कृष्णा अभिमत विद्यापीठ कराड येथे मुक्कामी थांबणार आहेत.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in