देवेंद्र फडणवीस यांनी मानले मोदी सरकारचे आभार.....

विरोधकांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर दुटप्पी भूमिका घेतली, याचा मला खेद वाटतो. आधी केंद्राने राज्यांचे अधिकार काढून घेतल्याची टीका केली, तर आता पुन्हा हा विषय केंद्र सरकारकडे कसा ढकलता येईल, याचा प्रयत्न चालविला जातोय.
देवेंद्र फडणवीस यांनी मानले मोदी सरकारचे आभार.....
Devendra Fadnavis thanked Modi government .....

मुंबई : 102 व्या घटनादुरूस्तीसंदर्भात, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करणारे 127 वे दुरूस्ती विधेयक संसदेने आज पारित केले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे आणि संसदेतील सदस्यांचे आभार मानतो. या निर्णयामुळे देशभरातील मागास घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या प्रक्रियेला सुद्धा कायदेशीर बळ मिळणार आहे, असे स्पष्ट मत  विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. Devendra Fadnavis thanked Modi government .....

.एखाद्या घटकाला मागास ठरविण्याचा अधिकार हा राज्यांचाच होता आणि तो यापुढे सुद्धा राज्यांनाच असला पाहिजे, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारची होती. 102 व्या घटना दुरूस्तीच्यावेळी संसदेत सुद्धा हीच भूमिका केंद्र सरकारने वारंवार स्पष्ट केली होती, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, 
तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यांतील मागास घटक हे राज्यांना, तर केंद्राच्या यादीतील मागास ठरविण्याचा अधिकार केंद्राला हे अधिक सुस्पष्ट केले. या निर्णयामुळे देशभरातील मागास घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या प्रक्रियेला सुद्धा कायदेशीर बळ मिळणार आहे.

मी पुन्हा एकदा या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद मोदी सरकारचे आभार मानतो. विरोधकांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर दुटप्पी भूमिका घेतली, याचा मला खेद वाटतो.  आधी केंद्राने राज्यांचे अधिकार काढून घेतल्याची टीका केली, तर आता पुन्हा हा विषय केंद्र सरकारकडे कसा ढकलता येईल, याचा प्रयत्न चालविला जातोय. पण, राजकारणाने आरक्षणाचे प्रश्न सुटणार नाहीत, असेही श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. 


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in