सहा वेळा डिपॉझिट जप्त होऊन अभिजित बिचुकलेंची हौस फिटेना.... 

त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्जही भरला. या निवडणुकीत त्यांना १३७ मते मिळाली. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. आजपर्यंत लढलेल्या सहा निवडणुकीत अभिजित बिचुकले यांचे डिपॉझिटच जप्त झाले आहे.
Deposit confiscated six times and Abhijit Bichukale's desire fades ...
Deposit confiscated six times and Abhijit Bichukale's desire fades ...

सातारा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत बिगबॉस फेम अभिजित बिचुकले रिंगणात होते. त्यांना १३७ मते मिळाली आहेत. श्री.बिचुकले यांनी यापूर्वी लोकसभा, विधानसभा तसेच राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणूका लढविल्या आहेत. पण आतापर्यंत त्यांना एकाही निवडणूकीत यश मिळालेले नाही. आतापर्यंत त्यांचे सहावेळा डिपॉझिट जप्त झाले आहे. तरीही त्यांची निवडणूक लढण्याची हौस फिटलेली नाही. पंढरपूर पोटनिवडणूकीत ही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. 

अभिजित बिचुकले या अवलियाने आतापर्यंत सातारा पालिका, सातारा विधानसभा, सातारा लोकसभा, पुणे पदवीधर, विधान परिषदेची पोट
निवडणूक, राष्ट्रपती पदाची निवडणूक, वरळी मतदारसंघ या ठिकाणी अर्ज दाखल केले होते. पण त्यांना यश मिळालेले नाही. मध्यंतरी तर त्यांनी मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, असे आवाहन आघाडी सरकारला केले होते.

अभिजित बिचुकले हे २००४ पासून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी प्रथम सातारा पालिकेची निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये पत्नी अलंकृता अभिजित बिचुकले यांना सातारा विधानसभा व सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे केले होते. अश्चर्य म्हणजे खासदार उदयनराजे भोसलेंच्या विरोधात त्यांना १२ हजार ६६२ मते मिळाली होती. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात त्यांना ८९१ मते मिळाली होती.

यानंतर २०१४ मध्ये अभिजित बिचुकले स्वतः निवडणूक रिंगणात उतरले. त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात साताऱ्यातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांना ३९२ मते मिळाली. तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सातारा लोकसभा लढली. या निवडणुकीत त्यांना ३६७७ मते मिळाली. या दोन्ही ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.एवढ्यावर न थांबता त्यांनी २०१९ ची सातारा-जावळी विधानसभा व सातारा लोकसभेच्या दोन्ही निवडणूका लढल्या.

सातारा विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेच्या विरोधात त्यांना ७५९ मते मिळाली. तर लोकसभेच्या निवडणूकीत २४१२ मते मिळाली. येथेही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. तर उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे झालेल्या सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीत अभिजित
बिचुकले यांनी आपली पत्नी अलंकृता बिचुकले यांना रिंगणात उतरविले. त्यांना १६३२ मते मिळाली होती.

तसेच त्यांनी पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कै. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांना ऐनवेळी आपला अर्ज मागे घ्यावा लागला होता. काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली. परंतु, त्यावेळी मतदानासाठी गेलेल्या बिचुकलेंचे
नावच मतदार यादीत सापडले नाही.

त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यापूर्वी २०१९ मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. त्यानंतर त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्जही भरला. या निवडणुकीत त्यांना १३७ मते मिळाली. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. आजपर्यंत लढलेल्या सहा निवडणुकीत अभिजित बिचुकले यांचे डिपॉझिटच जप्त झाले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com