बँका विकल्या, संस्था मोडल्या, त्यांना राष्ट्रवादीत घेण्याचा शिंदेचा अट्टाहास कशासाठी....

तुम्ही राष्ट्रवादीत, या नव्या पिढीचे नेतृत्व करा. पक्षाचे धोरण घ्या. बँकेला जवळीक करा. हे सर्व कशासाठी व का चालले आहे, असा प्रश्न दीपक पवार यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद नाही का, तर शंभर टक्के ताकद आहे. पण या माणसाशी जिल्हा बँकेसाठी जवळीक करण्याचे काय करण आहे.
Deepak Pawar fired a cannon at Shashikant Shinde and Shivendraraje
Deepak Pawar fired a cannon at Shashikant Shinde and Shivendraraje

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात मोठी ताकद असताना केवळ जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार शशीकांत शिंदे हे शिवेंद्रसिंहराजेंशी जवळीक करत आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचे आवाहन करत आहेत. ज्या माणसाने दोन बँका विकल्या पाच संस्था मोडीत काढल्या तो माणूस जिल्हा बँक काय चालविणार. त्यामुळे शशीकांत शिंदेंनी वल्गना थांबवून सातारच्या जनतेत व पक्षाच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करण्याचे थांबवावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी व्यक्त केली आहे. 

जिल्हा बँक व नगर पालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने शशिकांत शिंदेंनी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर काही दिवसांपूर्वी दिली होती. यावरून राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी शशीकांत शिंदेंना विनंती करतानाच शिवेंद्रसिंहराजेंवर टीकेची झोड उठविली आहे. 

दीपक पवार म्हणाले, शशीकांत शिंदेंनी खासदार शरद पवार यांचा अवमान करण्याचे थांबवावे. गेली चाळीस वर्षे अभयसिंहराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शरद पवार यांनी सत्तेच्या माध्यमातून राजकारणात संधी दिली. ते पवार साहेबांच्या आशीर्वादावर चाळीस वर्षे सातारा जिल्ह्यात व महाराष्ट्रात राजकारण करत आले आहेत. पण भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येणार नाही म्हणून विधानसभा निवडणूकीवेळी शिवेंद्रसिंहराजेंनी पवार साहेबांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर पवार साहेबांची साताऱ्यात भर पावसात सभा झाली. ही सभा देशभर गाजली. या सभेत त्यांनी मागील निवडणूकीत माझी चुक झाली, ती दुरूस्त करावी, असे आवाहन सातारच्या जनतेला केले. त्यातून सातारा विधानसभा मतदारसंघातील ७६ हजार मतदारांनी मला मतदान केले. केवळ १८ ते २० हजार मतांचा फरक निवडून येण्यासाठी राहिला होता. ७६ हजार मतदारांनी मला मतदान केले. ही सर्व बाजू एकीकडे असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माझे मित्र शशीकांत शिंदे हे शिवेंद्रसिंहराजेंना असे सांगतात.

तुम्ही राष्ट्रवादीत, या नव्या पिढीचे नेतृत्व करा. पक्षाचे धोरण घ्या. बँकेला जवळीक करा. हे सर्व कशासाठी व का चालले आहे, असा प्रश्न दीपक पवार यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद नाही का, तर शंभर टक्के ताकद आहे. पण या माणसाशी जिल्हा बँकेसाठी जवळीक करण्याचे काय कारण आहे. याच माणसाने स्वतःच्या दोन बँका विकल्या. पाच संस्था मोडीत काढल्या, हा माणूस बँक काय चालवणार. त्यामुळे शशीकांत शिंदे यांनी वल्गना थांबवाव्यात. आज मतदार वैफल्यग्रस्त झाला आहे.

जे जे पवारसाहेबांना सोडून गेले त्या सर्वांचा ते बंदोबस्त करतातच. मी सातत्याने शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार असो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो असून त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेत असताना मी भाजपच्या आमदाराला पक्षात प्रवेश द्या असे कधीही बोललो नाही. शशीकांत शिंदे आपण जे बोलता तो काय आपला घरगुती निर्णय आहे का, असा प्रश्न दीपक पवार यांनी केला आहे.  

माझी आमदार शिंदेंना विनंती आहे, की त्यांनी सातारच्या जनतेत व पक्षाच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करू नये. सातारा शहरातील जनता सुज्ञ असून मी पालिकेची निवडणूकही लढवलेली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये सातारा जावळी मतदारसंघात मी शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेची विकास कामे केली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ७६ हजार मतदारांच्या हितासाठी कृपया अशी विधाने करू नयेत, असे ही श्री. पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com