Decision to form Covid Task Force in the Satara District In Presence Of MP Udyanraje Bhosale | Sarkarnama

प्रशासनाला जमले नाही ते उदयनराजेंनी करून दाखविले

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 24 जुलै 2020

जिल्हयात कोविड टास्क फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतची घोषणा उदयनराजे भोसले यांनी या बैठकीत केली. यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगभरात असून, या संकटावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी उपाय योजना केल्या आहेत. त्याचा विचार करता सातारा जिल्हयात अनेक गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे.

सातारा : साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल राज्यसभेत शपथ घेतली आणि आज दुसऱ्यादिवशी जिल्ह्यात येऊन प्रथम कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भावर रोखण्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकिय व्यावसायिकांची विशेष बैठक घैतली. या बैठकीत सखोल चर्चा होऊन जिल्ह्यात कोविड टास्क फोर्स निर्माण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेऊन त्याची घोषणा उदयनराजे यांनी केली.

गेल्या पाच महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाउन सूरु असुन, लॉकडाउनमुळे अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत. विशेषत सर्व सामान्य नागरीकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. त्याचबरोबर डॉक्‍टर आणि उपचाराशी संबंधीत सर्व यंत्रणांवरती मोठा ताण आहे.

या यंत्रणा गेल्या पांच महिन्यापासून अहोरात्र काम करत आहेत. त्यांना ही संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यावर योग्य ती उपाय योजना करण्यासाठी जिल्यात सक्षम अशी यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा जिल्हयातील वैद्यकिय  व्यावसायिकांची विशेष बैठक घेतली.

या बैठकीत सखोल चर्चा होऊन जिल्हयात कोविड टास्क फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतची घोषणा उदयनराजे भोसले यांनी या बैठकीत केली. यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगभरात असून, या संकटावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी उपाय योजना केल्या आहेत. त्याचा विचार करता सातारा जिल्हयात अनेक गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे.

विशेषत लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांच्या रोजीरोटीची समस्या गंभीर बनत चालला आहे. गेली पाच महिने लॉकडाउन करुन सुध्दा रूग्णांची संख्या कमी झालेली
दिसत नाही. त्यामुळे लॉकडाउनच्या माध्यमातुन आपण नेमके काय साध्य केले, यावर विचार करण्याची गरज आहे.

त्याचबरोबर जे रूग्ण पॉझिटीव्ह आढळतात, त्यांची वर्गवारी केली पाहिजे. त्याबाबत नियोजन करण्याची गरज आहे. यावेळी वैद्यकिय व्यावसायिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर उपाय योजना करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. या बैठकीस सातारा जिल्हयातील नामवंत डॉक्‍टर्स उपस्थित होते. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख