रंग बदलण्याचे धाडस महाविकास आघाडी सरकारमध्येच : उद्धव ठाकरे

सातारा पोलिसांनी कोरोनात चांगले काम केले आहे. पोलिसांतील माणुसकी पहायला मिळाली. महाविकास आघाडी सरकारने पोलिसांना कोरोना योध्दा जाहीर करून ५० लाखांचे विमा संरक्षण दिले आहे.
Dare to change color only in Mahavikas Aghadi government says CM Uddhav Thackeray
Dare to change color only in Mahavikas Aghadi government says CM Uddhav Thackeray

सातारा : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलिस ठाण्याच्या इमारतीचे व वसाहतींच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना अजित पवारांनी पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या रंगावर लक्ष वेधले. प्रेझेंन्टेशनमधील इमारतीचा आणि पोलिस ठाण्याचा रंग मला आवडला नाही. पिवळा पट्टा आणि निळा पट्टा एकदम बेकार दिसतंय. चांगल्या पध्दतीने रंग देऊन इमारत उठावदार करा अशी सूचना त्यांनी केली. तोच धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या अनेक जण अनेक रंग दाखवत आहेत. पण हे रंग बदलायचे धाडसही दाखवावे लागते. हे रंग बदलण्याचे धाडस केवळ महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. Dare to change color only in Mahavikas Aghadi government says CM Uddhav Thackeray

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील पोलिस ठाणे व पोलिस वसाहतीचे ऑनलाईन भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलिस महसंचालक संजय पांडे, पोलिस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक श्री. फणसाळकर, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महानिरिक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक अजय बन्सल, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा तसेच अधिकारी उपस्थित होते.  

हेही वाचा : मोदींना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधींचा माफी मागण्यास नकार
 
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मल्हापरेठ पोलिस ठाण्याला नवी इमारत मिळावी व पोलिसांना राहण्यासाठी वसाहत मिळावी, यासाठी महाविकास आघाडीचे सरकार यावे त्यासाठीच हे काम इतके दिवस लांबले होते. शंभूराज देसाई १९९५ पासून प्रयत्न करत होते. गोपीनाथ मुंडे साहेब त्यावेळी गृहमंत्री होते. पण देर आऐ.. दुरूस्त आऐे... या माध्यमातून चांगल्या कामाची सुरवात होत आहे.

या कामाचे मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेले आहे, ही कामे वैयक्तिक लक्ष घालून कशी दर्जेदार होतील हे पहा, असा सल्ला त्यांनी शंभूराज देसाईंना दिला. प्रेझेंन्टेशनमधील इमारतीचा आणि पोलिस ठाण्याचा रंग मला आवडला नाही, असे सांगून अजित पवार म्हणाले, पिवळा पट्टा आणि निळा पट्टा एकदम बेकार दिसतंय. इमारत पूर्ण झाल्यावर त्याला चांगल्या पध्दतीने रंग देऊ. विवेकजी तुम्ही ठाणे परिसरात विविध कामे केलेली आहेत. त्यामुळे या इमारतींना चांगला रंग लावून इमारत उठावदार कशी दिसेल हे पहा.

पोलिस गृहनिर्माण विभाग दर्जेदार काम करत असून त्यावर देखरेख करणारी टिम उत्कृष्ट असून त्याला कुठे दृष्ट लागून देऊ नका. कामात सातत्य ठेवा. निधीत थोडी ओढाताण होणार आहे. तरी ही कामे दर्जेदार करा, आम्ही निधी देऊ. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावरच मल्हारपेठ हेअगाव आहे. आता या गावात पोलिस स्टेशन झाल्याने येथील कायदा व सुव्यवस्था ही मार्गी लागेल. येथे नरक्या तष्करी, गैरधंदे वाढल्याचे एकायला मिळतात. कायदा सुव्यवस्था राखण्यात आता पोलिस यशस्वी होतील.

सातारा पोलिसांनी कोरोनात चांगले काम केले आहे. पोलिसांतील माणुसकी पहायला मिळाली. महाविकास आघाडी सरकारने पोलिसांना कोरोना योध्दा जाहीर करून ५० लाखांचे विमा संरक्षण दिले आहे. कसाब सारख्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचे धाडस साताऱ्यातील पोलिस तुकाराम ओंबळे यांनी केले. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी साडे बारा हजार पदांची भरती करतोय. स्मार्ट पोलिसिंग योजना साताऱ्यात राबवा, अशी
सूचना त्यांनी केली. 

अजित पवारांच्या भाषणातील मुद्दा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणास सुरवात केली. ते म्हणाले, शंभूराज देसाई यांच्याशी माझा ऋणानुबंध फार जुना आहे. बाळासाहेब देसाई आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचा ऋणानुबंध होता. तेही दिवस आठवतात. मी त्यावेळी लहान होतो. त्यावेळी त्यांच्याशी संवाद झालेला नाही. पण मी अनुभवत होतो. दोन बाळासाहेबांच्या मनात एकमेकांविषयी आदर आणि सन्मान होता, त्याची आज मला आठवण झाली.

अजित पवार तुम्ही म्हणाला तो, योगा योग असेल का हे सांगता येणे शक्य नाही. दोन्ही बाळसाहेबांचे ऋणानुबंध हे काम आपल्या सर्वाच्या उपस्थितीत व्हावे, यामागे नक्कीच कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेले असावे. पोलिसांबद्दल सर्वांनी व्यक्त केलेल्या मतांशी मी सहमत आहे. भावना व्यक्त करणे सोपे असू शकेल. पोलिसांच्या कार्यक्रमाला गेल्यावर त्यांच्यावर चांगले बोलले पाहिजे. भावना व्यक्त करणे सोपा कार्यक्रम असेल पण प्रत्यक्ष भावना व्यक्त करू त्या प्रत्यक्षात आणणे हे फार महत्वाचे आहे.

या सरकारमध्ये भावना व्यक्त करणारी नव्हे तर भावना प्रत्यक्ष कागदावरून जमिनीवर आणणारी माणसे आपण आहोत. अजित पवार यांनी इमारतीच्या रंगाबद्दल भाषणात उल्लेख केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मला वाटते की मी एकटा कलाकार आहे. हल्ली माझी कला बासनात गुंडाळली गेली आहे. सध्या अनेक जण अनेक रंग दाखवतात. हे रंग बदलावे लागतात. रंग बदलायचे धाडसही दाखवावे लागते. रंग बदलण्याचे धाडस या महाविकास आघाडीच्याच सरकारमध्ये आहे. रंग लोक दाखवतात त्याला अर्थ नाही. रंग बदलण्याचे धाडस या सरकारमध्ये आहे, हे आज सर्वांच्या मनातून बाहेर आलेले आहे, असेही त्यांनी नमुद केले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com