अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्नसाठी साहित्य संमेलनात मोर्चा निघणार

नाशिक येथे 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन विज्ञानवादी लेखक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली 26 ते 28 मार्च दरम्यान होत आहे. त्या संमेलनात अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न द्यावा, असा ठराव करा या मागणीसाठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्यात येईल.''
Dalit Federation to form a morcha on Nashik sahitya sammelan ....
Dalit Federation to form a morcha on Nashik sahitya sammelan ....

कऱ्हाड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली आहे. अण्णाभाऊंची उपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होत असते. त्यांना भारतरत्न किताब देण्याचा ठराव नाशिकच्या संमेलनात करावा, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने नाशिकच्या साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कुसुमाग्रज यांच्या नाशिक येथील घरापासून संमेलन स्थळापर्यंत मोर्चा नेण्यात येईल, अशी माहिती दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
 
प्रा. म्हणाले, "अखिल भारतीय साहित्य महामंडळ हे अखिल मराठी भाषेचे आम्हीच प्रमुख, उध्वर्यू आहोत या आविर्भावात गेली 100 वर्षे काम करत आहे. मराठी भाषेचे पहिले साहित्य संमेलन 1872 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तेव्हापासून ही साहित्य परंपरा 94 वर्षे सुरू आहे. दलित महासंघ अण्णा भाऊ, फुले, आंबेडकरांचा सन्मान व्हावा, या विचाराचा आहे. या महापुरुषांनी साहित्याचे समाजशास्त्र मांडले आहे. 

1997 मध्ये नगरला झालेल्या 70 व्या साहित्य संमलेनात दलित महासंघाने अण्णा भाऊ साठेंचे स्मारक वाटेगावमध्ये उभे करावे, यासाठी संमेलनावर मोर्चा काढला होता. त्यानंतर 1998 लाही परळीच्या संमेलनावर मोर्चा काढला होता. 1993 मध्ये य. दी. फडकेंनी बेळगावच्या संमेलनातील अध्यक्षीय भाषणात त्याचा उल्लेख केला.

2008 मध्ये सांगलीतील 81 व्या संमेलनावर आम्ही अण्णा भाऊ साठेंना भारतरत्नचा ठराव करा, यासाठी मोर्चा काढला होता. नाशिक येथे 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन विज्ञानवादी लेखक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली 26 ते 28 मार्च दरम्यान होत आहे. त्या संमेलनात अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न द्यावा, असा ठराव करा या मागणीसाठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्यात येईल.'' 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com