लाच घेतल्याप्रकरणी दहिवडीचे वनपाल जाळ्यात; पोलिसांत गुन्हा दाखल

सापळा रचल्याचे लक्षात येताच स्विकारलेली रक्कम पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात स्थळी फेकून दिली. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले. पकडल्यानंतर त्यांच्याकडे व परिसरात लाच रकमेचा शोध घेतला असता लाच रक्कम मिळुन आली नाही.
लाच घेतल्याप्रकरणी दहिवडीचे वनपाल जाळ्यात; पोलिसांत गुन्हा दाखल
Dahivadi forester caught taking bribe; Filed a crime with the police

दहिवडी : माती बंधाऱ्याच्या कामाच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी लाच स्विकारल्याप्रकरणी माण वनविभागात कार्यरत असलेले वनपाल (Dahiwadi Forester) सुर्यकांत पोळ (रा. दहिवडी, मुळ रा. मार्डी, ता. माण) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Curruption Department) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Dahivadi forester caught taking bribe; Filed a crime with the police

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार हे पोट ठेकेदार म्हणून कामकाज करत आहेत. त्यांच्या संस्थेने मौजे शिंदी खुर्द येथे माती बंधारा बांधला आहे. या केलेल्या कामाचे बिलाचा धनादेश देण्यासाठी वनपाल सुर्यकांत पोळ यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार दोन जून रोजी त्यांनी लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्विकारली.

मात्र सापळा रचल्याचे लक्षात येताच स्विकारलेली रक्कम पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात स्थळी फेकून दिली. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले. पकडल्यानंतर त्यांच्याकडे व परिसरात लाच रकमेचा शोध घेतला असता लाच रक्कम मिळुन आली  नाही.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, संजय साळुंखे, संभाजी काटकर, विशाल खरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.  सेवा समाप्तीला फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना वनपाल श्री. पोळ लाच घेताना सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in