डबेवाले उभारणार 'स्वयंपाकघर'; तीन ठिकाणी सुविधा

कोरोनामुळे डबेवाल्यांचा रोजगार बुडाला. त्यांच्यासाठीच्या अनेक संकल्पना कागदावरच राहिल्या. त्यामुळे रोजगारासाठी आता डबेवाल्यांकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. सध्या या केंद्रीकृत स्वयंपाक घराचे काम ५० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेच्यावतीने देण्यात आली.
Dabewale to set up 'kitchen'; Facilities in three places
Dabewale to set up 'kitchen'; Facilities in three places

मुंबई : गेल्या १३० वर्षांपासून शिस्तबद्धपद्धतीने काम करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांना कोरोनामुळे मोठा फटका बसला. डबे बंद झाल्याने त्यांचा रोजगार थांबला. मात्र, आता पुन्हा डबेवाल्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी आणि मुंबईत एकटे राहणाऱ्या व्यक्तींसाठी डबेवाल्यांतर्फे तीन केंद्रीकृत स्वयंपाकघर सुरू करण्यात येणार आहे. 

मुंबईत एकटे राहणारे, कामामुळे स्वयंपाक बनविता येणे शक्य नसलेले जोडपे, वृद्ध माणसे यांना चांगल्या प्रकारचे जेवण देण्यासाठी केंद्रीकृत स्वयंपाकघर (सेंट्रलाइझ किचन) उभे करण्यात येणार आहेत. ही सुविधा मे-जून महिन्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील दोन ठिकाणी आणि मध्य रेल्वे मार्गावर एका ठिकाणी उभी केली जाणार आहेत.

कोरोनामुळे डबेवाल्यांचा रोजगार बुडाला. त्यांच्यासाठीच्या अनेक संकल्पना कागदावरच राहिल्या. त्यामुळे रोजगारासाठी आता डबेवाल्यांकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. सध्या या केंद्रीकृत स्वयंपाक घराचे काम ५० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेच्यावतीने देण्यात आली.

लवकरच 'जेवण' ॲप
 नागरिकांना मोबाईलद्वारे एका क्लिकवर जेवण मिळावे, यासाठी डबेवाल्यांतर्फे जेवण’ ॲपदेखील तयार करण्यात आले आहे. ॲपचे कामदेखील वेगात सुरू असून येत्या दोन महिन्यात जेवण’ ॲप नागरिकांसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली. 

'डिजिटल डबेवाला' प्रकल्प रखडला

गेल्यावर्षी डिजिटल डबेवाला या प्रकल्पांतर्गत 'पेपर आणि पार्सल' हे ॲप सुरू करण्यात येणार होते. या ॲपमुळे कुरिअर आणि पार्सल यांचे काम डबेवाल्यांद्वारे केले जाणार होते. डबेवाल्याचे लोकेशन कंपनीला व ग्राहकांना कळून जो डबेवाला जवळ असेल, त्याला त्या कुरीअरचे कॉल जातील व तो पार्सल स्वीकारेल, अशी हि सेवा होती; मात्र कोरोनामुळे सध्या या ॲपचे कामही रखडले आहे.

कोरोना रुग्णांसाठी धाव

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सरकारी, खासगी रुग्णालयात रुग्णांना वेळेत बेड मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून काम धंदा गमावून बसलेले मुंबई डबेवाले जनसेवा करण्यासाठी पुढे आले आहेत. डबेवाल्यांनी पुण्यातील आळंदीमधील धर्मशाळेत कोरोना केअर सेंटर उभे करण्याची संकल्पना मांडली आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. या ठिकाणी जवळपास १०० ते १५० रुग्णांवर उपचार होऊ शकतो, एवढी जागा उपलब्ध आहे. शिवाय इतर प्राथमिक सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देणार असल्याचे मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते विनोद शेटे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com