पीकविमा : दानवेंनी मागणी केली आणि भुसेंनीही प्रस्ताव पाठवला...

राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही.
पीकविमा : दानवेंनी मागणी केली आणि भुसेंनीही प्रस्ताव पाठवला...
Crop insurance: Danve demanded and Bhuse also sent a proposal ...

नाशिक/मालेगाव : तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अडचणी आल्याने मुदतवाढीची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यानुसार केंद्र सरकारकडून मुदतवाढ मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. त्याचवेळी राज्यातील अधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारने आज केंद्र सरकारकडे पाठविल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. Crop insurance: Danve demanded and Bhuse also sent a proposal ...

श्री. दानवे म्हणाले, की पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवार (ता. १५) पर्यंत होती. मात्र राज्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे योजनेत सहभागी होता आले नाही अशी माहिती मला मिळाली. त्यानुसार केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केंद्रीय कृषी सचिवांना माझे पत्र पाठवले. त्यावेळी राज्य सरकारकडून मुदतवाढीचा प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती मिळाली. 

मग राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे आणि कृषी सचिवांशी मी स्वतः संपर्क साधून प्रस्ताव पाठवण्यास सांगितले. त्यानुसार राज्याचा प्रस्ताव जाताच, केंद्राकडून मुदतवाढ दिली जाईल. श्री. भुसे म्हणाले, की आतापर्यंत राज्यातील सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in