वास्को निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरडाओरडा केल्याने रेल्वेतून बाहेर फेकले

घाटरस्ता असल्याने रेल्वेचे स्पीड कमी होते. यामुळे पीडित मुलीला किरकोळ दुखापत झाली. सकाळच्या सुमारास स्थानिकांनी या मुलीला पाहिलं आणि तिला उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात या पीडित मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पाोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
वास्को निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरडाओरडा केल्याने रेल्वेतून बाहेर फेकले
Crime In Vasco Nijamuddin Experss Near satara

सातारा : वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस मधून 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अतिप्रसंग करताना आरडाओरडा केला म्हणून एका नराधमाने सदर मुलीला रेल्वेतून बाहेर फेकले. साताऱ्यातील लोणंद ते वाठार स्टेशनच्या दरम्यान, पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळी जखमी अवस्थेत सापडलेल्या या मुलीला लोणंद येथील ग्रामस्थांनी उपचारासाठी लोणंद ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. 

लोणंद पोलिस आणि लोहमार्ग पोलिसांनी या मुलीचा पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी अवस्थेत सापडलेल्या या मुलीचा लोहमार्ग पोलिसांनी जबाब घेतला असून या मुलीने आपल्या जबाबात ही घडलेली घटना सांगितली आहे. रेल्वे मध्ये अशा प्रकारे घटना घडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी वेगाने तपास करत हे दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला भुसावळमध्ये अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा निझामुद्दीन एक्सप्रेस साताऱ्यात पहाटे सव्वा एकच्या सुमारास येते. 

या गाडीत काल रात्री एक कुटुंब प्रवास करत होतं. आपल्या तीन मुलींसह हे दांम्पत्य दिल्लीला निघाले होते. रात्री जेवण झाल्यावर हे कुटुंब झोपले असताना आरोपीने झोपलेल्या 12 वर्षीय मुलीला बाथरूममध्ये नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीला जाग आली आणि तिने आरडाओरड सुरू केला. त्यामुळे आरोपीने तिला ओरडू नको तुला आई-वडिलांकडे नेतो. असं म्हणत बाथरूममधून बाहेर आणले आणि रेल्वेतून बाहेर फेकले.

घाटरस्ता असल्याने रेल्वेचे स्पीड कमी होते. यामुळे पीडित मुलीला किरकोळ दुखापत झाली. सकाळच्या सुमारास स्थानिकांनी या मुलीला पाहिलं आणि तिला उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात या पीडित मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पाोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. राज्य लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण ट्रेनमधील प्रत्येक डब्यात पोलिस टीम पाठवल्या यानंतर पीडित मुलीने दिलेल्या वर्णनानुसार चार जणांपैकी एक आरोपी असल्याचं लक्षात आले.

पोलिसांनी व्हॉट्सॲपवरुन आराोपीचा फोटो रुग्णालयातील पोलिसांना पाठवला. त्यानंतर या पीडित मुलीने त्याला ओळखलं आणि 10 तासांत आरोपीला अटक केली.
पीडित मुलीच्या चेहऱ्यावर मार लागला असून पायाला फ्रॅक्टर झाला आहे आणि हाताला सुद्धा लागले आहे. आरोपी हा सैन्यात कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in