गोपीचंद पडळकरांवर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा... - Crime against MLC Gopichand Padalkar at Vita Police Station ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

गोपीचंद पडळकरांवर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा...

विजय पाटील
बुधवार, 21 जुलै 2021

ऑनलाईन पध्दतीने देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (ता. १९) रोजी पार पाडला होता.

सांगली : बाणूरगड येथील बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यास गर्दी जमविल्याप्रकरणी आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा भंग केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Crime against MLC Gopichand Padalkar at Vita Police Station

ऑनलाईन पध्दतीने देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (ता. १९) रोजी पार पाडला होता. 

हेही वाचा : काँग्रेस आमदारांनीच मुख्यमंत्र्यांविरोधात ठोकला शड्डू

या कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार गोपीचंद पडळकर होते. याप्रसंगी गर्दी जमवल्याप्रकरणी आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा भंग केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

आवश्य वाचा : मुख्यमंत्री येडियुरप्पांचा केंद्रातील भाजप नेतृत्वालाच दे धक्का!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख