मोदी सरकारच्या फाजील आत्मविश्वासामुळे देश गंभीर संकटात; आरोग्यमंत्र्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांना पदच्युत करा.....    - The country is in a serious crisis due to the overconfidence of the Modi government; Remove health ministers and their colleagues ..... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मोदी सरकारच्या फाजील आत्मविश्वासामुळे देश गंभीर संकटात; आरोग्यमंत्र्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांना पदच्युत करा.....   

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

मोदींनी जागतिक अर्थ परिषदेसमोर भाषण करताना, भारताने कोरोनाला कसे हरवले, अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटून घेतण्याचा हस्यास्पद प्रकार आता अंगलट येत आहे. जगातील ५० पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घत्ततली आहे, ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्या समोर हात पसरावे लागत आहेत.

सातारा : ऑक्सिजन पुरवठ्याबाबत फाजील आत्मविश्वासामुळे आज देश गंभीर संकटात असून मोदी सरकारने केलेल्या अक्षम्य चुकांची आणि वेळेत निर्णय न घेतल्याची किंमत देशाला मोजावी लागत आहे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांना उत्तरे हवी असून या सर्व दुरवस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला प्रसिध्दी पत्रकाव्दारे काही प्रश्न विचारले आहेत. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, मोदी सरकारने एक लाख मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुर केली. मात्र, ती कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे देशाला आज अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दवाखाने आणि रूग्णांच्या नातेवाईकांना मिनिटामिनिटाला फोन येत आहेत.

रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास काही रूग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजन तुटवड्यामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दिल्लीत खासगी रूग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे, हे विदारक चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण ऑक्सिजन बाबत सुस्थितीत आहोत हा आरोग्य मंत्रालयाने केलेला दावा कशाच्या आधारावर होता. एक लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकिय ऑक्सिजन आयातीचे काय झाले.

पाच महिन्यात तो का आयात झाला नाही, ही प्रक्रिया कोणी थांबवली, याचे
उत्तर मिळाले पाहिजे. मोदींनी जागतिक अर्थ परिषदेसमोर भाषण करताना, भारताने कोरोनाला कसे हरवले, अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटून घेतण्याचा हस्यास्पद प्रकार आता अंगलट येत आहे. जगातील ५० पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घत्ततली आहे, ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्या समोर हात पसरावे लागत आहेत.

एकुणच मोदी सरकारने केलेल्या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला किंमत मोजावी लागत आहे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मृत्यूमुखी पडले. त्यांना उत्तरे हवी आहेत. या दुरवस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने
पदच्युत केले पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख