सरकारी मालमत्ता विकुन चाललाय देश; इंधन दरवाढीच्या बोजाने सामान्य माणूस मोडलाय - Countries selling government property; The burden of fuel price hike has broken the common man | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

सरकारी मालमत्ता विकुन चाललाय देश; इंधन दरवाढीच्या बोजाने सामान्य माणूस मोडलाय

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 जुलै 2021

भारत ८५ टक्के कच्चे तेल आयात करतो. पंतप्रधान मनमोहन सिंग असताना त्यावर कर लावला नव्हता. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले तरी इंधनाचे दर वाढले नव्हते. मात्र मोदी सरकारचा तोटा कमी करण्यासाठी लोकांवर कर लावुन तिजोरी भरण्याचा सपाटा लावला आहे. त्याविरोधात आमचे आंदोलन आहे.

कऱ्हाड : देशाची अर्थव्यवस्था हातळण्यात केंद्र सरकारची अक्षम्य चुक झाली आहे. सरकारी कंपन्या, इमारती, मालमत्ता विकुन सरकार चालले आहे. सामान्य माणसांवर इंधन दरवाढीचा बोजा टाकल्याने सामान्य माणूस मोडला आहे. त्याविरोधात मोदी हटाव-देश बचाव हा नारा देण्यासाठी सायकल रॅली काढुन निषेध नोंदवला आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.  Countries selling government property; The burden of fuel price hike has broken the common man

कराड शहरातील कोल्हापुर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन काँग्रेसच्या सायकल रॅलीस आमदार चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चव्हाण म्हणाले, पेट्रोल - डिझेलच्या करवाढीमुळे इंधन दरवाढ झाली आहे. ती करवाढ मागे घेऊन इंधनाचे दर कमी करावेत, यासाठी आज सायकल रॅली काढुन आंदोलन केले.

हेही वाचा : राजनाथसिंह, गोयल यांच्यानंतर पवार थेट मोदींच्या भेटीला..दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबते

हे प्राथमिक स्तरावरील आंदोलन आहे. त्यातुन दरवाढ कमी करण्याची विनंती मोदी सरकारला करणार आहोत. अर्थव्यवस्था हातळण्यात केंद्र सरकारची अक्षम्य चुक झाली आहे. सरकारी कंपन्या, इमारती, मालमत्ता विकुन सरकार चालले आहे. सामान्य माणसांवर इंधन दरवाढीचा बोजा टाकल्याने सामान्य माणूस मोडला आहे. १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. २३ कोटी लोक दारिद्रयरेषेखाली गेले आहेत. त्याविरोधात मोदी हटाव-देश बचाव हा नारा देण्यासाठी सायकल रॅली काढुन निषेध नोंदवला आहे.

आवश्य वाचा :  मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याऱ्या विहिंपच्या कार्यकर्त्यास पोलिस कोठडी

भारत ८५ टक्के कच्चे तेल आयात करतो. पंतप्रधान मनमोहन सिंग असताना त्यावर कर लावला नव्हता. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले तरी इंधनाचे दर वाढले नव्हते. मात्र मोदी सरकारचा तोटा कमी करण्यासाठी लोकांवर कर लावुन तिजोरी भरण्याचा सपाटा लावला आहे. त्याविरोधात आमचे आंदोलन आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख