दरोड्याच्या गुन्ह्यातील कोरोनाबाधित संशयिताचे जिल्हा रूग्णालयातून पलायन  - Coronation suspect escapes from district hospital | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

दरोड्याच्या गुन्ह्यातील कोरोनाबाधित संशयिताचे जिल्हा रूग्णालयातून पलायन 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

 गेल्या तीन दिवसांपासून संबंधित संशयितावर जिल्हा रूग्णालयातील कोरोना वॉर्डामध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी संबंधिताने पोलिसांच्या हातावर तूरी देत जिल्हा रूग्णालयातून पलायन केले आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सातारा : दरोड्याचा गुन्हा दाखल असलेला व कोरोना बाधित संशयिताने आज पोलिसांच्या हातावर तूरी देऊन सातारा जिल्हा सर्वसाधारण रूग्णालयातून पलायन केले आहे. हा संशयित मूळचा मध्यप्रदेश राज्यातील आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

या 25 वर्षीय संशयिताच्या विरोधात उंब्रज पोलिस ठाण्यात दरोड्याचा व पोलिसांना मारहाण केल्याचे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून संबंधित संशयितावर जिल्हा रूग्णालयातील कोरोना वॉर्डामध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी संबंधिताने पोलिसांच्या हातावर तूरी देत जिल्हा रूग्णालयातून पलायन केले आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख