साताऱ्याच्या पालकमंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग

पालकमंत्री पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रशासन अलर्ट ठेवण्याचे काम संकट काळात केले आहे.
Minister Balasaheb Patil
Minister Balasaheb Patil

कराड : सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 पालकमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काल रात्रीनंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालकमंत्री पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रशासन अलर्ट ठेवण्याचे काम संकट काळात केले आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत कराडला कोल्हापूर व सातारा जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक झाली होती.

त्याचे नियोजन पालकमंत्री पाटील यांनी केले होते. पालकमंत्री पाटील यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना मध्यरात्रीनंतर कृष्णा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com