वाईत कोरोनाची स्थिती चिंताजनक; जननायकांची केवळ स्टंट बाजीतून जनतेची दिशाभूल

मंजूर झालेले 180 ऑक्सिजन बेडस्‌ आणि तीन रुग्णवाहिका खरच जनतेला मिळाल्या का, हे तपासण्याची गरज आहे. इतक्या महत्वाच्या आणि गरजेच्या विषयाचे नक्की काय झाले, हे जनतेला कळलेच पाहिजे. आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेचा फज्जा उडाला आहे, असे सांगून विराज शिंदे यांनी म्हटले की, बेडस्‌ उपलब्ध होत नाहीत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.
Corona's condition in Wai taluka is worrisome, neglected by people's representatives
Corona's condition in Wai taluka is worrisome, neglected by people's representatives

सातारा : वाई तालुक्यात रोजची कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येऊ शकतो. या परिस्थितीला नक्की कोणाला जबाबदार धरणार, असा प्रश्न उपस्थित करून जननायक म्हणून मिरवणारे लोकप्रतिनिधी केवळ जाहिरात बाजीचा स्टंट करुन जनतेची दिशाभूल करीत आहेत. हा जनतेचा विश्वासघात आहे, अशी सडेतोड टीका युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्यावर केली आहे. 

वाई तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना नागरीकांना पुरेसे बेड उपलब्ध होत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. विराज शिंदे यांनी म्हटले की, वाई मतदारसंघात आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमातंर्गत निधीची तरतूद केली होती. त्यानूसार मॅप्रो गार्डन येथे 50 ऑक्सिजन बेडस्‌, खंडाळा तालुक्यात जगताप हॉस्पिटलमध्ये 50 ऑक्सिजन बेडस्‌, पाचगणी येथील डॉन अकादमीत  100 ऑक्सिजन बेडस्‌ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार होती.

तसेच तीन तालुक्यांसाठी तीन रूग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार झाला होता. मंजूर झालेले 180 ऑक्सिजन बेडस्‌ आणि तीन रुग्णवाहिका खरच जनतेला मिळाल्या का, हे तपासण्याची गरज आहे. इतक्या महत्वाच्या आणि गरजेच्या विषयाचे नक्की काय झाले, हे जनतेला कळलेच पाहिजे. आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेचा फज्जा उडाला आहे, असे सांगून विराज शिंदे यांनी म्हटले की, बेडस्‌ उपलब्ध होत नाहीत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.

रूग्णवाहिका वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे सामान्य लोकांचे प्रचंड हाल होत आहे. खासगी दवाखाने लोकांना परवडत नाहीत. लोकांवर सोने नाने मोडून, जमिनी गहाण ठेवून दवाखान्याची बिले भरण्याची वेळ आली आहे. पैशा अभावी लोकांचे जीव जायला लागले आहेत. खासगी रुग्णालये सामान्य जनतेच्या ऐपती बाहेर आहेत. लोकप्रतिनिधींनी नुसती जाहिरातबाजी आणि स्टंट करुन लोकांचे जीव वाचणार नाहीत. आज 180 ओक्सिजन बेडस आणि तीन रुग्णवाहिका उपलब्ध असत्या तर दुसऱ्या लाटेचा सामना करता आला असता.

लोकांना होणारा भुर्दंड थांबवता आला असता. लोकांचे जीव वाचवता आले असते. बेड उपलब्ध नसल्यामुळे पेशंटचे होणारे हाल थांबवता आले असते.
वाई तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येऊ शकतो नक्की कोणाला जबाबदार धरणार. जननायक म्हणून मिरवणारे लोकप्रतिनिधी केवळ जाहिरात बाजीचा स्टंट करुन जनतेची दिशाभूल करीत आहेत. हा जनतेचा विश्वासघात आहे, अशी टीका श्री. शिंदे यांनी केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com