राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर, यंत्रणा कोलमडली, मृतांचा आकडा वाढतोय : गिरीश महाजन - Corona's condition is critical in the state, system collapses, death toll rises says Girish Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर, यंत्रणा कोलमडली, मृतांचा आकडा वाढतोय : गिरीश महाजन

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

राज्यात काय चाललं आहे, हे काहीच कळत नाही. मृतांचा आकडा ही वाढतोय. पण सरकार फारसे गंभीर दिसत नाही. शासन राज्यात पूर्णपणे फेल झाले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी ते आता मृतांचे आकडेही लपवित आहेत. मला काय बोलावे हे कळतच नाही.

जळगाव : राज्यात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा कोलमडली आहे. मृतांचा आकडा सांगितला जातोय, त्यापेक्षा तो कितीतरी अधिक आहे. त्यामुळे शासनाने गांभीर्य पूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, अशी टीका भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रच्रारातून श्री. महाजन आज महाराष्ट्रात आले. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. रुग्णांना रेमडेसिवर इंजेक्शन मिळत नाही. ऑक्सिजनची परिस्थितीही अशीच आहे.

राज्यात काय चाललं आहे, हे काहीच कळत नाही. मृतांचा आकडा ही वाढतोय. पण सरकार फारसे गंभीर दिसत नाही. शासन राज्यात पूर्णपणे फेल झाले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी ते आता मृतांचे आकडेही लपवित आहेत. मला काय बोलावे हे कळतच नाही. ज्या गांभीर्याने विषय घेतला पाहिजे त्या गांभीर्याने सरकार त्याकडे लक्ष देत नाही. केवळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख