गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस - Corona vaccine taken by Shambhuraj Desai | Politics Marathi News - Sarkarnama

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

जिल्ह्यात कोरोना लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९४ हजार ९५६ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये ६० वर्षावरील २६ हजार ३८६ तर इतर आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षापर्यंतच्या पाच हजार ८९५ नागरीकांचा समावेश आहे.

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या कुटुंबियांसह क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, गृहराज्यमंत्री यांचे फॅमिली डॉक्टर सुरेश शिंदे व डॉ. भास्कर यादव उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९४ हजार ९५६ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये ६० वर्षावरील २६ हजार ३८६ तर इतर आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षापर्यंतच्या पाच हजार ८९५ नागरीकांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभरात १४१ रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत १८७४ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सध्या १८०१ रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुररू आहेत. आतापर्यंत ६१ हजार ०२७ जणांना कोरोनाची लागण झाली होती, त्यापैकी ५७ हजार ३५२ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहेत.

 लोकप्रतिनिधींचे लसीकरण कधी होणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते. आतापर्यंत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी लसीकरण करून घेतले आहे. आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन कुटुंबियांसह लसीकरण करून घेतले. आज मी जिल्हा रूग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जिल्ह्यातील या टप्यातील पात्र लाभार्थ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख