जिवंत मुलाला दाखविले कोरोनाने मृत; फलटण तालुक्यातील प्रकार  - Corona showed the living child dead; Incidents in Phaltan taluka | Politics Marathi News - Sarkarnama

जिवंत मुलाला दाखविले कोरोनाने मृत; फलटण तालुक्यातील प्रकार 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 जून 2021

त्यानंतर त्या स्वतः मुलांसमवेत फलटण पालिकेच्या आरोग्य विभागाच्या नागरी सुविधा केंद्रात गेल्या. तेथे त्यांना जिल्हा रुग्णालयातील मृतांच्या यादीत नाव असल्याचे सांगण्यात आले होते. त्या यादीत त्या मुलाचे नाव होते. त्यावर आईने आरोग्य विभागाच्या काराभाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान जिवंत मुलास मृत घोषित करण्याचा या प्रकाराने कुटुंबियांस मनस्ताप सहन करावा लागला. 

सातारा : कोविड 19 रुग्ण संख्येच्या गोंधळानंतर आता चक्क जिवंत युवकाला कोरोनामुळे मृत झाल्याचे घोषित करण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात घडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनावरील उपचार घेऊन बरा झालेल्या युवकास त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा दूरध्वनी आल्याने युवकासह त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. Corona showed the living child dead; Incidents in Phaltan taluka

फलटण शहरातील सिद्धांत भोसले युवकाची मे महिन्यात कोविड 19 ची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याने एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तो कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी गेला. गेल्या महिन्यांपासून त्याने त्याचे दैनंदिन कामकाजास सुरु केले होते. सोमवारी (ता. सात) त्यास एक दूरध्वनी आला. त्याने तो घेताला, पलीकडून त्याला त्याचे कोविडने निधन झाल्याचे ऐकायला मिळाले.

हेही वाचा : उद्धव ठाकरे यांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ यावे

हा दूरध्वनी फलटण नागरी आरोग्य सुविधा केंद्रातून आला होता. त्याने संबंधित महिलेचे वाक्‍य ऐकताच एं आई हे बघ काय म्हणतायंत, असे म्हणत मोबाईल आईकडे दिला. त्याच्या आईला देखील तसेच सांगण्यात आले. त्यावर आईने अहो तुम्ही म्हणत आहात, तो माझा मूलगा असून माझ्या समोरच उभा आहे. असे अभद्र बोलताना तुम्हांला काहीतरी वाटतं का.. असे ठणकावून सांगितले. त्यावर पलीकडून हे काम फलटण पालिकेच्या नागरी आरोग्य सुविधा केंद्रातून होत आहे.

आवश्य वाचा : चंद्रपूर महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नेमणार : नाना पटोले

त्यावर आईने ठीक आहे, मी पाहते काय ते असे सांगितले. त्यानंतर त्या स्वतः मुलांसमवेत फलटण पालिकेच्या आरोग्य विभागाच्या नागरी सुविधा केंद्रात गेल्या. तेथे त्यांना जिल्हा रुग्णालयातील मृतांच्या यादीत नाव असल्याचे सांगण्यात आले होते. त्या यादीत त्या मुलाचे नाव होते. त्यावर आईने आरोग्य विभागाच्या काराभाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान जिवंत मुलास मृत घोषित करण्याचा या प्रकाराने कुटुंबियांस मनस्ताप सहन करावा लागला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख