साताऱ्यात कोरोना वाढला; विनामास्क वावरणाऱ्यांवर कारवाईचे गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

सध्या 100 नागरिकांच्या उपस्थित लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत आहे. परंतु लग्न समारंभात 500 ते 1000 नागरिक उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेथे लग्न समारंभ होत आहे तेथे भेट देऊन शासनाने व प्रशासनाने दिल्या सूचनांचे पालन होते काय हे पहावे. पालन होत नसल्यास कारवाई करण्यात यावी.
Corona patients increased in Satara district; Shambhuraj Desai orders officers to take action
Corona patients increased in Satara district; Shambhuraj Desai orders officers to take action

सातारा : राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करण्यासोबतच सुरक्षित अंतराचे पालन करून वेळोवेळी हात धुवावेत. रस्त्यावर विनामास्क वावरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई त्यांनी अधिकाऱ्यांना केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबतची आढावा बैठक मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.. 

रस्त्यावर विनामास्क वावरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करुन श्री. देसाई म्हणाले, कोरोनाचा संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा. 

नगर परिषद व मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता या विषयी जनजागृती करावी. सध्या 100 नागरिकांच्या उपस्थित लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत आहे. परंतु लग्न समारंभात 500 ते 1000 नागरिक उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेथे लग्न समारंभ होत आहे तेथे भेट देऊन शासनाने व प्रशासनाने दिल्या सूचनांचे पालन होते काय हे पहावे. पालन होत नसल्यास कारवाई करण्यात यावी. तसेच पोलिस विभागाने पेट्रोलींगचे प्रमाण वाढविले पाहिजे, अशा सूचना श्री. देसाई यांनी दिल्या. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com