कोरोना ही बिल गेटस्‌ची कल्पना; तो व्हायरस नसून दहशत : बंडातात्या कराडकर

कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे ताप, थंडी, सर्दी, कफ, खोकला अशी सामान्य असून तो जीवघेणा रोग नाही. (मुळात कोरोनाच नाही) त्यावर आयुर्वेदांत शेकडो उपाय आहेत. पण सरकार त्या उपायांना प्राधान्य देत नाही. कारण ही औषधे बिल गेट्सची नाहीत.
Corona is Bill Gates' idea; It is not a virus but terror says Bandatatya Karadkar
Corona is Bill Gates' idea; It is not a virus but terror says Bandatatya Karadkar

बिजवडी : गेले वर्षभर कोरोनाचा खेळ खेळणारे सरकार आता कोरोना लस घेण्यासाठी परत एकदा कोरोनाची लाट आल्याचे नाटक करून भारतीयांना फसवत व लुटत आहे. कोरोनाची कल्पना बिल गेट्सच्या डोक्यांतून निर्माण झाली असून भारतासह अनेक देश बिल गेट्सची खेळणी आहेत. हे जगातील अनेक तज्ञ ओरडून सांगत आहेत. तरीही लोकांचे डोळ्यांत धूळ फेकणे चालू आहे. त्यामुळे कोरोना हा व्हायरस नसून दहशत आहे, असेपरखड मत हभप बंडातात्या कराडकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

बंडातात्यांनी म्हटले की, भारतात प्रतिवर्षी कॅन्सरने मरणाऱ्या रुग्णांची संख्या सरकारी माहितीनुसार साडेसात ते आठ लाख आहे. दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या अडीच लाख आहे. असे असतांना फक्त बनावट कोरोनाने मरणाऱ्या रुग्णांची संख्या वाढवून सांगितली जाते. तंबाखू, तंबाखूजन्य व अन्य मादक पदार्थांचे उत्पादन, विक्री व सेवनावर कोणतेही बंधन नाही. यावरून सरकार दांभिक आहे हे सिद्ध होते. 

कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे ताप, थंडी, सर्दी, कफ, खोकला अशी सामान्य असून तो जीवघेणा रोग नाही. (मुळात कोरोनाच नाही) त्यावर आयुर्वेदांत शेकडो उपाय आहेत. पण सरकार त्या उपायांना प्राधान्य देत नाही. कारण ही औषधे बिल गेट्सची नाहीत. सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्सची सेवा करावयाची आहे. म्हणून लॉकडाउनचे नाटक चालू आहे. यातून जनतेचा उद्रेक झाला तर ती क्रांती असेल व न झाला तर दुसऱ्या पारतंत्र्याची नांदी असेल असेही बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे. माझे हे वैयक्तिक परखड मत असून यास कुठलाही संप्रदाय व संघटना जबाबदार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com