राहुल गांधींच्या विरोधात मोदी सरकारचा कट.... 

त्यांचे फोन टॅपिंग केले का, हा प्रश्न लोकसभेत विचारण्यात येत असताना पंत्रधान लोकसभेत व राज्यसभेत गैरहजर राहून उत्तर देत नसतील तर लोकसभा चालू न देण्याचा दोष हा भाजपचाच असल्याचा पलटवार त्यांनी केला.
राहुल गांधींच्या विरोधात मोदी सरकारचा कट.... 
Conspiracy of Modi government against Rahul Gandhi ....

भंडारा : राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात बॉम्ब स्फोट होणे ही गंभीर बाब असून त्यांच्या विरोधात कट सुरू असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. Conspiracy of Modi government against Rahul Gandhi ....

दोन दिवसांपूर्वी राहूल गांधी हे श्रीनगर दौऱ्यावर होते. त्यांच्या कार्यक्रमापासून पाचशे मीटरव बॉम्ब स्फोट झाला होता. मुळात तेथे राष्ट्रपती शासन सुरू असून केंद्र सरकारचे नियंत्रण असताना हा स्फोट होणे हा राहूल गांधी यांच्या विरोधातील कट असल्यचा आरोप नाना पटोले यांनी केला.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानपिचक्या ही घेतल्या असून नोटबंदीवेळी मोदींनी काळ पैसा परत येणार, आतंकदवाद, नक्षलवाद संपणार असा उल्लेख केला होता, याची आठवण करून देत श्री. पटोले यांनी पंतप्रधान मोदींनी या बॉम्ब स्फोटाची चौकशी करावी, अशी मागणी केली. 

सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू असून लोकसभा चालू न देणे हा भाजपचा दोष असल्याचा आरोप करून नाना पटोले म्हणाले, अधिवेशन सुरू झाल्यापासून लोकांचे व्यक्तीगत स्वातंत्र्य हिरावण्यास केंद्र सरकारने सुरवात केली आहे. नेत्यांचे फोन टॅपिंग केले का, हा प्रश्न लोकसभेत विचारण्यात येत असताना पंत्रधान लोकसभेत व राज्यसभेत गैरहजर राहून उत्तर देत नसतील तर लोकसभा चालू न देण्याचा दोष हा भाजपचाच असल्याचा पलटवार त्यांनी केला. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in