'कृष्णा'च्या निवडणुकीतून काँग्रेस बाजूला; राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

कृष्णाचे क्रियाशील, अक्रियाशील सभासदांच्या निर्णयात पालकमंत्री पाटील यांनी सहकारमंत्री म्हणून दिलेला निर्णयही पक्ष बळकटीचा ठरत आहे. अविनाश मोहिते यांनी बहुतांशी बैठकांमध्ये राष्ट्रवादी ठामपणे सोबत आहे, असे जाहीर केले आहे.मात्र, दोन्ही मोहित्यांच्या एकत्रीकरणावर राष्ट्रवादीतून अद्यापही काहीही मत व्यक्त झालेले नाही. राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार, यावर बरेच काही अवलंबून आहे.
Congress side in 'Krishna's' election; Attention to the role of the NCP
Congress side in 'Krishna's' election; Attention to the role of the NCP

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात दोन्ही मोहित्यांचे एकत्रिकरणाच्या प्रक्रियेतून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मोहित्यांच्या एकत्रिकरणातून काँग्रेस बाजूला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या एकत्रिकरणात राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार, याकडे कृष्णाकाठचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार हे या मनोमिलनावर काय भूमिका घेणार, त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 

राज्य सरकारमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेसने कृष्णा कारखान्यात समविचारी भूमिका घेण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी मुंबईला दोन, सातारा व नंतर कऱ्हाडला बैठकांचे सत्र सुरू होते. डॉ. मोहिते, अविनाश मोहिते यांच्यातील सवतासुभा संपविण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी काँग्रेस नेत्यांनी दोन वेळा कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. त्यामुळे आमदार चव्हाण यांच्यासह सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर हे सातत्याने बैठका घेऊन दोन्ही मोहित्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत होते. 

दिवस-रात्र चर्चेच्या झालेल्या फेऱ्यांची उत्सुकता असतानाच अखेर रविवारी रात्रीपर्यंत एकमत झाले नाही. त्यानंतर काल (सोमवारी) आमदार चव्हाण यांनी एकत्रिकरणाच्या चर्चेतून बाहेर पडत आहे, असे जाहीर केले. त्याचवेळी एकत्रीकरणाची प्रक्रिया थांबली आहे, असे म्हणता येणार नाही, अशी आमदार चव्हाण यांनी घेतलेली स्पष्ट भूमिकाही बरेच काही सांगून जाते. त्यामुळे त्यांची भूमिका ही दोन्ही मोहित्यांच्या एकत्रीकरणाला स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही, असे जाणकारांचे मत आहे. 

राष्ट्रवादीकडून एकत्रिकरणाची चर्चा केवळ अविनाश मोहितेच करत होते, असे आत्तापर्यंत दिसत आहे. सांगली, सातारा जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्यापही त्यात काहीही भूमिका किंवा मत व्यक्त करत नाहीत. मात्र, जलसपंदामंत्री जयंत पाटील व सहकामंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटांच्या हालचाली राष्ट्रवादीलाच पोषक आहेत. सांगलीचे पालकमंत्री म्हणून पाटील यांची परवाच डॉ. इंद्रजित मोहिते व डॉ. सविता मोहिते यांनी भेट घेतली.

त्या हालचाली बेदखल कराव्यात, अशा निश्चित नाहीत. कृष्णाचे क्रियाशील, अक्रियाशील सभासदांच्या निर्णयात पालकमंत्री पाटील यांनी सहकारमंत्री म्हणून दिलेला निर्णयही पक्ष बळकटीचा ठरत आहे. अविनाश मोहिते यांनी बहुतांशी बैठकांमध्ये राष्ट्रवादी ठामपणे सोबत आहे, असे जाहीर केले आहे. मात्र, दोन्ही मोहित्यांच्या एकत्रीकरणावर राष्ट्रवादीतून अद्यापही काहीही मत व्यक्त झालेले नाही. राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार, यावर बरेच काही अवलंबून आहे.

त्यातही ज्येष्ठ नेते शरद पवार काय निर्णय देणार, त्यावरही राजकीय हालचाली अवलंबून आहेत. त्यांनीही अद्याप निर्णय दिलेला नाही. मोहिते यांनी ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला शरद पवार हे रेठऱ्यात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी त्याही कार्यक्रमातून वेळ काढून अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यामुळे त्यांचा दोन्ही मोहित्यांशी असलेला घरोबाही 'कृष्णा'च्या राजकारणात महत्त्वाचा ठरू शकतो. 

उंडाळकर गट शांतच... 
ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांना मानणारा गट कृष्णा कारखान्यात नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. मोहिते, भोसले गटांसह अविनाश मोहिते गटासही त्याचा अनुभव आहे. मात्र, ज्येष्ठ नेते उंडाळकर यांच्या पश्चात ‘कृष्णा’ची पहिली निवडणूक आहे. त्यामुळे उंडाळकर गट अद्यापही सायलेंट आहे. गटाचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे एकत्रिकरणाच्या प्रक्रियेत सक्रिय होते.  एकत्रिकरणाविषयी त्यांनी यथावकाश भूमिका स्पष्ट  करणार असल्याचे म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com