काँग्रेस, सेनेचे मंत्री सहकार्य करत नाहीत... राष्ट्रवादीच्या बैठकीत तक्रारीचा सूर
Congress, Shivsena ministers are not cooperating ... Complaint tone in NCP meeting

काँग्रेस, सेनेचे मंत्री सहकार्य करत नाहीत... राष्ट्रवादीच्या बैठकीत तक्रारीचा सूर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांत कोणत्या पक्षाबरोबर आघाडी आणि युती करायची याचा निर्णय स्थानिक स्तरावरील पदाधिकार्यांनी घ्यावा, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.

मुंबई : महाविकास आघाडीच्या राज्य सरकारमधील मंत्र्यामध्ये एकोपा असला तरी स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार-खासदार, पालकमंत्री, संपर्कमंत्री यांच्यात फारसे आलबेल नाही, अससा नाराजीचा सुर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उमटला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार व पराभूत उमदेवारांसह पक्षपदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. Congress, Shivsena ministers are not cooperating ... Complaint tone in NCP meeting

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित या बैठकीला राष्ट्रवादीचे मंत्री आणि खासदारही उपस्थित होते. साडेपाच तास चाललेल्या या बैठकीत सुमारे ५५ जणांनी मते मांडली. विद्यमान आमदारांसह पराभूत उमेदवारांनी सरकार आणि पक्ष यांच्यात स्थानिक पातळीवर फारसं समाधानकारक चित्र नसल्याची खंत व्यक्त केली. 

ज्या ठिकाणी पालकमंत्री कॉंग्रेस अथवा शिवसेनेचे आहेत तिथे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना सापत्न वागणूक मिळते. तर मंत्रालयात या दोन्ही पक्षाचे मंत्री देखील पक्षप्रतिनिधी आणि आमदारांची कामे करताना कुचराई करतात, अशी व्यथा काहीजणांनी मांडली. प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सरकारच्या पाठीशी असले तरी मंत्री आणि पालकमंत्री मात्र, स्वपक्षाचे आमदार आणि पदाधिकार्यांच्या कामालाच प्राधान्य देतात, अशी नाराजी देखील काही जणांनी व्यक्त केली.

यावर, बोलताना शरद पवार म्हणाले, तीन पक्षाचे सरकार असल्याने असे मतभेद होत असतील. दोन पक्षाच्या सरकारमधेही या अडचणी असतात. एका पक्षाचे सरकार असले तर अनेक पदाधिकाऱ्यांत स्पर्धा असतेच. त्यामुळे अशी नाराजी न ठेवता जनहिताचे कार्यक्रम राबवणे महत्वाचे आहे.  आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांत कोणत्या पक्षाबरोबर आघाडी आणि युती करायची याचा निर्णय स्थानिक स्तरावरील पदाधिकार्यांनी घ्यावा, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in