राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडी; साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत बिघाडी...  - Congress-NCP breakdown in Satara ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडी; साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत बिघाडी... 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 मे 2021

आत्तापर्यंत फक्त खोटारडेपणा करून स्वतःच तोंडच काळ केलेत ना? आमदार काय कंपन्यांच्या जीवावर झालाय का? ज्या जनतेने आमदार केलेय त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं?  तुम्ही काय करताय ना ते जनता सर्व बघत आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना लांब जाताना पाहिलेय आणि ह्या सगळ्या परिस्थितीला तुमच्यासारखी निष्क्रिय लोक जबाबदार आहेत.

सातारा : वाईचे आमदार मकरंद पाटील (MLA Makrand Patil) यांनी कोरोनाबाबत केलेल्या उपाय योजनांची पत्रकार परिषदेत खोटी माहिती दिल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे (Viraj Shinde) यांनी सोशल मीडियातून केला आहे. राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून गळ्यात गळा घालून फिरणाऱ्या काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीची (Nationalist Congress party) साताऱ्यात मात्र, बिघाडी झाल्याचे चित्र आहे. Congress-NCP breakdown in Satara ...

सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याने यावर उपाय योजना काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांना साताऱ्यात येऊन प्रशासकिय यंत्रणेचे कान धरले. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक व पोलिस अधीक्षकांच्या कामगिरीवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत कामकाज सुधारा अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा दमही भरला.

हेही वाचा : ..राजकीय दबाव, पैशाचे आमिष दाखवून भाजपचे नगरसेवक फोडले!

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत साताऱ्यातील आमदारांतील एक तरी निलेष लंके होईल का, या प्रश्नावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई संतप्त झाले. आम्हीही काम करता असतो त्यासाठी मतदारसंघात जाऊन पहा, असा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिला. पण त्यांनी नंतर नमती भूमिका घेतली. या वादात हस्तक्षेप करत वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी वाई मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामाची तपशीलवार माहितीच दिली होती. 

आवश्य वाचा : प्रेयसीसोबत डेटिंगवर असताना मेहूल चोकसीला पकडले.. ब्राऊन यांचा खुलासा

यावर दुसऱ्या दिवशी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मकरंद पाटील यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यासमोर वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचा आरोप केला. तसेच आमदारांनी सांगितलेल्या या सर्व गोष्टींची पडताळणी जागेवर जाऊन करून सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला.

विराज शिंदे यांनी सोशल मीडियातून केलेल्या या टीकेत म्हटले की, आबा आता थांबा...!  खुद्द उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्रांसमोर आपल्या जननायकांनी खोट्या माहितीचा भर उन्हाळ्यात अक्षरशः पाऊस पाडला. जननायक म्हणवून घेता अन्‌ जनतेसाठी काय करता, असा प्रश्न करून स्वतः काही करायचे नाही पण दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय खायचे.  आत्तापर्यंत जनतेला खोटी आश्वासने देतंच आलाय. अन्‌ आता भर पत्रकार परिषदेत तोंड भरून खोटं बोलून आलाय. पण जनता काय एवढी भोळी वाटली काय? 

मांजराने किती डोळे बंद करून दूध पिले तरी बाकीच्यांना ते दिसतेच आणि आता तेच झालंय. इकडे एवढे बेड्स आहेत, मी एवढे दिलेत, भरभरून बोललात पण सत्य परिस्थिती काय आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे.  सातारा जिल्हा रेड झोनमध्ये गेलाय तो असाच नाही. तुमच्यासारखे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक जोपर्यंत सत्तेत असतील तोपर्यंत असेच चालणार ना! तुम्ही आणि तुमचे कंपनी एजंट कंपन्यांकडून घेताय आणि ढोल वाजवताय स्वतःचा. तुमचे पदाधिकारी ही कंत्राटदार आणि तुम्ही त्यांचे नायक, कंपन्यांनी एवढे दिलं, कंपन्यांनी हे केलं ते केलं. आहो तुम्ही काय केलं जननायक? 

आत्तापर्यंत फक्त खोटारडेपणा करून स्वतःच तोंडच काळ केलेत ना? आमदार काय कंपन्यांच्या जीवावर झालाय का? ज्या जनतेने आमदार केलेय त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं?  तुम्ही काय करताय ना ते जनता सर्व बघत आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना लांब जाताना पाहिलेय आणि ह्या सगळ्या परिस्थितीला तुमच्यासारखी निष्क्रिय लोक जबाबदार आहेत. पण खोटं बोलण्याची गरज काय होती? स्वतः उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री दौऱ्यावर होते, सत्यपरिस्थिती त्यांनाही  समजली असती तर नक्कीच त्यांनी मदत केली असती.

आपल्याकडे पुरेशे बेड्स नाहीयेत, सुविधांची कमतरता आहे. प्रशासनाला सर्व गोष्टींची जाणीव करून दिली असती. तुमचे काम तुम्ही व्यवस्थित पार पाडले असते तर जनतेला त्याचा नक्कीच लाभ झाला असता. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी जनतेच्या जीवाशी का खेळताय, असा प्रश्नही विराज शिंदे यांनी शेवटी उपस्थित केला आहे. राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस व राष्ट्रवादी जरी एकत्र नांदत असले तरी साताऱ्यात मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सुर जुळलेले नाहीत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख