काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ, लोकाभिमुख नेतृत्व हरपले.... - Congress lost its loyal, pro-people leadership Says Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ, लोकाभिमुख नेतृत्व हरपले....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

काही दिवसांपूर्वी विलासकाका व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी 30 वर्षाचे वैरत्व संपवून एकत्र काम करण्याची जाहीर कार्यक्रमात घोषणा केली. दरम्यान गेले काही दिवसांपासून विलासकाका आजारी होते. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. 

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. आयुष्यभर काँग्रेस पक्षाच्या विचारांशी एकनिष्ट राहून जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे लोकाभिमुख नेतृत्व आज हरपले आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कै. विलासराव पाटील उंडाळकर यांना श्रध्दांजली वाहिली. 

माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज निधन झाले. काही दिवसांपूर्वी विलासकाका व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी 30 वर्षाचे वैरत्व संपवून एकत्र काम करण्याची जाहीर कार्यक्रमात घोषणा केली. दरम्यान गेले काही दिवसांपासून विलासकाका आजारी होते. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. 

निधनाचे वृत्त समजल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाज माध्यमातून आपली भावना व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे.

त्यांच्या रूपाने संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहून जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे लोकाभिमुख नेतृत्व आज हरपले आहे. अनेक संकटे, प्रलोभने आली पण त्यांनी कधीही काँग्रेस विचारांशी फारकत घेतली नाही. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख