मोदी सरकार हटविण्याचा लढा काँग्रेसने वडूजमधून सुरू केलाय...

केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. देशावरील ५५ हजार कोटी रुपये कर्जाचे एक लाख दहा हजार कोटी पर्यंत पोहचले आहे.
मोदी सरकार हटविण्याचा लढा काँग्रेसने वडूजमधून सुरू केलाय...
Congress has started the fight to remove Modi government from Vaduj ...

निमसोड/वडूज : केंद्रातील जुलमी मोदी सरकार खोटे स्वप्न दाखवून सत्तेत आले. महत्वाच्या सरकारी संस्था विकून सात वर्षे देश लुटण्याचे काम भाजपने केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांना अपमानित करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. या जुलमी राजवटीला हटविण्यासाठी नव्या स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी हुतात्म्यांचे ऊर्जास्त्रोत असणार्‍या वडूजनगरीतून सुरूवात होत आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. Congress has started the fight to remove Modi government from Vaduj ...

वडूज (ता. खटाव) येथील हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्यासाठी लढलेल्या व बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कॉग्रेसच्यावतीने हुतात्मा अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी कॉग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, पक्षाच्या सहप्रभारी सोनल पटेल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, उल्हासदादा पवार, सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस विनायक देशमुख, अभय छाजेड, माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, गुलाबराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील, भानुदास माळी, मनेष राऊत आदी उपस्थित होते.

आवश्य वाचा : सचिन वाझेने मुख्यमंत्र्यांपासून सत्य लपविलं!
 
देशाला लुटून विकणार्‍या मोदी सरकार ने भारतीय रेल्वेला 'अदाणी रेल्वे' करण्याचे पाप केल्याचा घणघणात करून नाना पटोले म्हणाले, एकीकडे देशाच्या स्वायत्ता संस्था विकण्याचा सपाटा सुरूच असून देशाला खिळखिळे बनवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. 'खोटं बोल पणं रेटून बोल', सोशल मीडियाचा गैरवापर करीत संपूर्ण प्रचार - प्रसार माध्यमे वेठीस धरण्याचे धोरण राबवत असल्याने सोशिक जनताच भाजप बुरखा फाडून समूळ नष्ट करणार आणि देशात पुन्हा सोनियाचे दिवस येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान देणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्यासह कित्येक स्वातंत्र्य सैनिकांचा यांना विसर पडला आहे.यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांच्या साठ वर्षांच्या कालावधीतील महत्वपूर्ण साठ प्रश्न घेऊन आम्ही काँग्रेस कार्यकर्ते सामान्य जनतेपर्यंत पोहचणार असून भाजपामुक्त देश या नव्या स्वातंत्र्य लढ्यासाठी हाक देणार आहोत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, वडूजही क्रांतिकारकांची भूमी असून स्वातंत्र्यवीर सोनहिरा नदीकाठचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण,‌ वसंतदादा पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, किसन वीर, दादासाहेब उंडाळकर आदींच्या योगदानामुळे देशात क्रांतीकारकांची प्रेरणा ज्योत तेवत ठेवली जात आहे.
 
केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. देशावरील ५५ हजार कोटी रुपये कर्जाचे एक लाख दहा हजार कोटी पर्यंत पोहचले आहे. जुलमी सरकार विरोधात जर बोलाल तर इडीची चौकशी लावली जाते. आम्ही राज्यात लोकशाही आघाडीचे सरकार केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणांच्या विरोधात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकार म्हणून महाराष्ट्रात काम करीत आहोत.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर देशात दुसरीकडे एकाचवेळी नऊ हौतात्म्य पत्करणारी हुतात्मानगरी म्हणून वडूजला संबोधले जाते.

घटनात्मक संस्थांचा गळा घोटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. आंतरराष्ट्रीय एनजीओ संस्थांनी केलेल्या पाहणीमध्ये भारतामध्ये लोकशाही लोप पावत चालली असून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हेरगिरी प्रकरणासाठीचे वापरलेले सॉफ्टवेअर म्हणजे आपल्या नागरीकतत्वाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. आपले संविधान वाचविण्याची जबाबदारी तुम्हा- आम्हा वरती आली असल्याचे त्यांनी सुचित केले. 

यशोमती ठाकूर यांच्याकडून मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट करून राज्याचे प्रभारी एच. के. पाटील पुढे म्हणाले, देशाला विकणार्‍या सरकारचा धिक्कार करून ते रोखण्याचे काम सध्या काँग्रेस करीत आहे. 'अंबानी-अदाणी' या खाजगी क्षेत्रातील लोकांना सरकारी संस्था विकण्याचे काम  'ईस्ट-इंडिया' कंपनीप्रमाणे मोदी सरकार करीत आहे. पत्रकारांनी वास्तव भूमिका मांडल्यामुळेच मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 

रणजितसिंह देशमुख म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान देणाऱ्या नऊ हुतात्म्यांचे स्मरण सदैव तेवत ठेवण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे.या हुतात्म्यांना प्रतिवर्षी नऊ सप्टेंबरला अभिवादन करण्याचीही परंपरा माजी आमदार केशवराव पाटील व विलासकाका पाटील उंडाळकर यांनी अविरतपणे सुरू ठेवली होती. हाच वारसा पुढे अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेस कार्यकर्ते कायम आग्रहभागी राहणार आहे.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोकराव गोडसे, अॅड. विजयराव कणसे, खटाव-माण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ.महेश गुरव , तालुकाध्यक्ष डाँ .विवेक देशमुख, तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने,युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, रजनीताई पवार, शिवराज मोरे, डॉ. संतोष गोडसे, विजय शिंदे आदींसह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, वडूज येथे हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्य सैनिक व वरसांचा सुतीहार व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरंच्या हस्ते गौरविण्यात आले. हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या जयराम स्वामी वडगाव ते वडूजपर्यंत ५०० कार्यकर्त्यांची हुतात्मा ज्योती सोबत दौड करण्यात आली होती. तसेच कळंबी, पुसेसावळी, उंचीठाणे, वर्धनगड आदी ठिकांणाहून हुतात्मा ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते. 


 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in