गृहमंत्री अमित शहा यांना बडतर्फ करण्याची मागणी

राहुल गांधींची हेरगिरी करणे हा कोणता राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे, असा खोचक सवाल सुरजेवाला यांनी केला.
The Congress has demanded the removal of Home Minister Amit Shah
The Congress has demanded the removal of Home Minister Amit Shah

दिल्ली : कथित हेरगिरीच्या पेगॅसस प्रकरणामध्ये राहुल गांधींचेही नाव आल्यानंतर संतप्त कॉंग्रेसने भाजप म्हणजे भारतीय जासूस पार्टी असा टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना कॉंग्रेसने लक्ष्य केले. अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अमित शहा यांना तत्काळ बडतर्फ केले जावे आणि या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचीही चौकशी केली जावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. 

या मुद्द्यावर संयुक्त रणनीती ठरविण्यासाठी अन्य विरोधी पक्षांसोबत संपर्काचीही घोषणा कॉंग्रेसने केली आहे. कॉंग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी आणि मुख्यप्रवक्ते सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्ला चढवला. 

राहुल गांधींची हेरगिरी करणे हा कोणता राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे, असा खोचक सवाल सुरजेवाला यांनी केला. भाजप म्हणजे ‘भारतीय जासूस पार्टी’ असा टोला लगावताना भारताने पेगॅसस स्पायवेअर कधी खरेदी केले. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी की गृहमंत्री अमित शहा यांनी परवानगी दिली, या स्पायवेअरसाठी किती रुपयांचा मोबदला देण्यात आला, अशी सवालांची फैरीही सुरजेवाला यांनी झाडली.

संसदेत दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या निवेदनाची खिल्ली उडविताना सुरजेवाला यांनी, नोव्हेंबर २०१९ मध्ये तत्कालीन माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी १२१ जणांची पेगॅसस स्पायवेअरमार्फत हेरगिरी होत असल्याचे संसदेच्या पटलावर, मान्य केले होते, याकडे लक्ष वेधले. तसेच आधीचे मंत्री खोटे बोलत होते की आताचे खोटे बोलत आहेत, असा खोचक सवाल केला.


पेगॅसस प्रकरणामध्ये अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी अमित शहा यांची असताना त्यांना पदावरून तत्काळ बडतर्फ केले जावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेच्या चौकशीची नितांत गरज आहे.
 
- मल्लिकार्जुन खर्गे (राज्यसभेतील विरोधी पक्षनेते)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in