कोरोना लढ्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचे ६० लाख - Congres Leader Prithviraj Chavan's Rs 60 lakh for Corona fight | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना लढ्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचे ६० लाख

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

रुग्णसंख्या वाढली तरी सद्यस्थितीत उपलब्ध कोरोना रुग्णालयांत रुग्णांना बेड व व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाहीत. त्याचा विचार करुन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेषबाब म्हणून स्थानिक विकास निधीतून ६० लाखांचा निधी कोरोनासाठी मंजूर केला आहे. त्यातुन दोन रुग्णवाहिका आणि १० व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत.

 

कऱ्हाड : कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णसंख्या वाढली तरी सद्यस्थितीत उपलब्ध कोरोना रुग्णालयांत बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. त्याचा विचार करुन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेषबाब म्हणून स्थानिक विकास निधीमधील ६० लाखांचा निधी कोरोनासाठी मंजूर केला आहे. त्यातुन दोन रुग्णवाहिका आणि १० व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरु झाल्यापासून आजपर्यंत सातत्याने लोकपयोगी उपक्रमात आमदार चव्हाण यांनी भाग घेतला आहे. मतदारसंघातील जनतेशी थेट भेटीपासून ते मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.

त्यांनी गरजू लोकांना धान्याचे वाटप, गावागावांत स्वतः जाऊन कोरोनाबाबत जनजागृती, रेशन दुकानांमधून धान्यांचे योग्य प्रकारे वितरण होते का, याची पाहणी करुन रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरणाबद्दल जनतेकडुन काय अपेक्षा आहेत, याची माहिती घेतली. त्यामध्ये आढलेल्या त्रुटीबाबत अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या मार्गी लावल्या आहेत.

राष्ट्रीय प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध माध्यमांच्या द्वारे प्रश्न विचारून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांनी मतदारसंघात सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र राबविणे, अत्यावश्यक सेवा किमान वेळेत सुरु करणे आदी महत्वाच्या गोष्टीं सुचविल्या व त्याची अंमलबजावणीसाठी आग्रही राहिले. त्यामुळे जनतेला लॉकडाऊन काळात किमान सुविधांचा अभाव जाणवला नाही. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

रुग्णसंख्या वाढली तरी सद्यस्थितीत उपलब्ध कोरोना रुग्णालयांत रुग्णांना बेड व व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाहीत. त्याचा विचार करुन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेषबाब म्हणून स्थानिक विकास निधीतून ६० लाखांचा निधी कोरोनासाठी मंजूर केला आहे. त्यातुन दोन रुग्णवाहिका आणि १० व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत. त्यातील दोन रुग्णवाहिका कऱ्हाड व मलकापूर पालिकेस तर व्हेंटिलेटर हे वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासह अन्य कोरोना रुग्णालयास देण्यात येणार आहेत. 

व्यवहाराची माहिती नसणारे रोहित पवारही जीएसटीवर बोलतात : देवेंद्र फडणवीस

माण तालुक्‍यात आठ हजार हेक्टरवर एमआयडीसी होणार

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख