`जलयुक्त` बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन करत सदाभाऊंच्या फडणविसांना शुभेच्छा... - Congratulations to Fadnavis given by Sadabhau Khota while worshiping the water in the Jalyukt Shivar dam | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

`जलयुक्त` बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन करत सदाभाऊंच्या फडणविसांना शुभेच्छा...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

राज्य सरकारकडून सुरू असलेल्या चौकशी वर बोलताना चौकशी काय करता, भरलेल्या बंधाऱ्यात उड्या मारून पोहायला लागा, मग कळेल, असा टोलाही यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

सांगली : राज्यातील जलयुक्त शिवार कामांवर होत असलेले आरोप आणि चौकशीच्या पार्श्वभूमीवर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जलयुक्त शिवारातुन ओसंडून वाहणाऱ्या बंधाऱ्यात उतरत पूजन करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. जलयुक्त शिवार बंधाऱ्यातुन ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे पूजन करत सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. Congratulations to Fadnavis given by Sadabhau Khota while worshiping the water in the Jalyukt Shivar dam

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने जलयुक्त शिवार कामांचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील युतीच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारकडून चौकशी लावण्यात आलेली आहे. 

हेही वाचा : बंडखोरी नगरसेवकांची भाजपकडूनच होतेय पाठराखण?

या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामांचे ठिकाणी पाणी पूजन करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. वाळवा तालुक्यातल्या मरळनाथपूर या ठिकाणी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात उतरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे पूजन केले.

आवश्य वाचा : द्वेषाच्या राजकारणात कोरोनाने शिकवले प्रेम

तसेच राज्य सरकारकडून सुरू असलेल्या चौकशी वर बोलताना चौकशी काय करता, भरलेल्या बंधाऱ्यात उड्या मारून पोहायला लागा, मग कळेल, असा टोलाही यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख