शरद पवारांनी संजय राऊतांकडे व्यक्त केली याविषयीची चिंता... 

शिवसेना आणि भाजप यांच्यात कोरोनावरील उपाय योजनांबाबत आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्याबद्दल विचारले असता, हे आरोप प्रत्यारोप होत राहतील. मात्र,महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. सगळे खांब मजबुतीने उभे आहेत, असा दावा त्यांनी केला.
Concerns expressed by Sharad Pawar in front of Sanjay Raut ...
Concerns expressed by Sharad Pawar in front of Sanjay Raut ...

सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढला असून आता लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. याबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. कोरोना संदर्भात शरद पवार चिंताग्रस्त आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

संजय राऊत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीचा त्यांनी पुर्नउच्चार केला. ते म्हणाले,  सध्या कोरोनाची वाढलेली परिस्थिती पाहता लोकांचे जीव वाचविणे महत्वाचे आहे. कोरोना संदर्भात खासदार शरद पवारही चिंताग्रस्त असून ते सतत माहिती घेत आहेत. 

शिवसेना आणि भाजप यांच्यात कोरोनावरील उपाय योजनांबाबत आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्याबद्दल विचारले असता, हे आरोप प्रत्यारोप होत राहतील. मात्र, महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. सगळे खांब मजबुतीने उभे आहेत, असा दावा त्यांनी केला. 

देशातील नेमकी परिस्थिती समजण्यासाठी संसदेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी देशभरातील सर्व नेत्यांची भूमिका आहे. कोरोनाविषयी त्यामध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. तरच देशातल्या परिस्थितीचे आकलन होईल. सरकार आणि विरोधी पक्ष महत्वाचे नसून जनतेचे हित महत्वाचे आहे, अशी भूमिका राऊत यांनी मांडली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com