कोरोनात दिलासा : महाबळेश्वरच्या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे होतंय कौतूक - Comfort in Corona: The generosity of two corporators of Mahabaleshwar is appreciated | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनात दिलासा : महाबळेश्वरच्या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे होतंय कौतूक

अभिजित खुरासणे
बुधवार, 28 एप्रिल 2021

हॉटेलमध्ये दोन दिवसात विलगीकरण कक्ष प्रारंभ करणार असल्याची माहीती या वेळी मुख्याधिकारी यांनी दिली. विलगीकरणासाठी नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले हॉटेल मोफत दिल्याचे पाहुन या विलगीकरण कक्षात दाखल होणारे कोरोना बाधित रूग्णांच्या नाश्ता, चहा व जेवणाची मोफत सोय करण्याचे नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांनी या वेळी जाहीर केले.

महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या जेष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले संपूर्ण हॉटेल कोरोना बाधित रूग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी मोफत पालिकेच्या स्वाधिन केले आहे. याच विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना बाधित रूग्णांच्या नाश्ता, चहा व दोन वेळच्या जेवणाची सोय नगरसेवक रविंद्र कुंभारदरे हे मोफत करणार आहेत. या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे महाबळेश्वर परिसरातून कौतुक होत आहे. 

कोरोनाचे रूग्ण वाढु लागले आहेत. महाबळेश्वर येथील लहान घरे असलेल्या कुटुंबातील कोणाला कोरोनाची लागण झाली. तर त्यांची घरात स्वतंत्र सोय करणे शक्य होत नाही. अशी लक्षणे नसलेल्या व विलगीकरणाची घरी गैरसोय नसलेल्या कोरोनाबाधित रूग्णांच्या सोईसाठी नगराध्यक्षा यांनी विलगीकरणाची सोय केली होती. परंतु या कक्षात दाखल होण्यासाठी पाच हजार रूपये भरावे लागणार होते. कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला असुन अनेकांचे रोजगार बंद आहेत. 

अशा स्थितीत विलगीकरण कक्षासाठी पाच हजार रूपये भरणे कठीण होणार असल्याने अशा कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी येथील माजी नगराध्यक्षा व जेष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी विलगीकरणासाठी आपले संपूर्ण हॉटेल पालिकेच्या स्वाधिन केले आहे. महाबळेश्वर येथील सुभाष चौकात प्रेसिंडेट नावाचे पारठे यांचे हॉटेल आहे. विलगीकरण कक्ष सुरू करण्यापुर्वी तेथे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहे. 

याची पाहणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली. या वेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर, नगरसेविका विमलताई पारठे, शारदा ढाणक, स्नेहल जंगम, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, संजय पिसाळ, ॲड. संजय जंगम आदी मान्यवरांसह रोहित ढेबे, संदीप मोरे, अनिकेत रिंगे, संजय दस्तुरे हे देखील उपस्थित होते. 

हॉटेलमध्ये दोन दिवसात विलगीकरण कक्ष प्रारंभ करणार असल्याची माहीती या वेळी मुख्याधिकारी यांनी दिली. विलगीकरणासाठी नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले हॉटेल मोफत दिल्याचे पाहुन या विलगीकरण कक्षात दाखल होणारे कोरोना बाधित रूग्णांच्या नाश्ता, चहा व जेवणाची मोफत सोय करण्याचे नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांनी या वेळी जाहीर केले. कोरोना बाधित रूग्णांच्या सोईसाठी पालिकेचे दोन नगरसेवकांनी दाखविलेले दातृत्वाचे शहरातुन कौतुक होत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख