जादा बिल घेणाऱ्या हॉस्पिटलना दणका : वीस लाख परत करण्याचे कलेक्टरांचे आदेश - Collector orders to return Rs 20 lakh to hospitals that charge extra bills | Politics Marathi News - Sarkarnama

जादा बिल घेणाऱ्या हॉस्पिटलना दणका : वीस लाख परत करण्याचे कलेक्टरांचे आदेश

उमेश बांबरे
गुरुवार, 27 मे 2021

तपासणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यापैकी १८३ रूग्णांची जादा बिल आकारणी रूग्णालयांकडून झाल्याचे उघड झाले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित हॉस्पिटलकडून तब्बल २० लाख ५६ हजार ७४३ रूपयांची रक्कम रूग्णांना परत करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना केले आहेत. 

सातारा : कोरोना बाधित (Corona Pandemic) रूग्णांवर उपचार केल्यानंतर जिल्ह्यातील रुग्णालयांकडुन आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारांची बिले पथकांमार्फत (Corona Bill Audit) तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत एकूण 183 रुग्णांची जादा आकारणी करण्यात आलेली  20 लाख 56 हजार ७४३ रूपयांची रक्कम परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी (Satara Collector) शेखर सिंह (Shekhar Sinh) यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. Collector orders to return Rs 20 lakh to hospitals that charge extra bills

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कोरोना बाधित रुग्णांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन दिली जाते का, याबाबत शासनाने वेळावेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होते का, तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे बाबनिहाय वैद्यकीय उपचारांची बिले देयक योग्य आहेत का, याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील 63 हॉस्पिटलसाठी  63 ऑडीटर व तपासणी अधिकाऱ्यांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत राडा : उद्धव ठाकरे आणि पवारांपर्यंत तक्रारी

या पथकामार्फत एकूण 63 हॉस्पिटलमधील 4579 एवढ्या रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत रुग्णालयांनी 22 कोटी 62 लाख 20 हजार २३९ रूपयांची रक्कम आकारली होती. सातारा जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २८ हॉस्पिटलमध्ये सुरु असून या हॉस्पिटलमध्ये एकूण बेडच्या 80 टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

आवश्य वाचा : मराठा आरक्षण;समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल : चंद्रकांत पाटलांचा इशारा

तपासणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यापैकी १८३ रूग्णांची जादा बिल आकारणी रूग्णालयांकडून झाल्याचे उघड झाले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित हॉस्पिटलकडून तब्बल २० लाख ५६ हजार ७४३ रूपयांची रक्कम रूग्णांना परत करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना केले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख