सहकारी कारखान्यांनी कोरोना रूग्णालयांची निर्मिती करावी : शरद पवार 

कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी सूचना करून श्री. पवार म्हणाले, नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
NCP MP Sharad Pawar
NCP MP Sharad Pawar

सातारा : सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन एक छोटेसे अद्यावत रुग्णालयाची निर्मिती करुन ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.  

कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या आढावा बैठकीत श्री. पवार बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसेच खासदार व आमदार उपस्थित होते. 

शरद पवार म्हणाले, कोरोनाचे संकट हे अख्ख्या जगावर आले आहे. आपल्या देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन एक छोटेसे अद्ययावत रुग्णालयाची निर्मिती करुन ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे.

कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी सूचना करून श्री. पवार म्हणाले, नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपला देश, राज्य नक्की कोरोनामुक्त होईल, असा विश्वास श्री. पवार यांनी या बैठकीत व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com