सहकारमंत्र्यांची लोकशाही आघाडी पालिका निवडणूक स्वबळावर लढणार - Co-operation Minister's Democratic Front will contest the municipal elections on its own | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

सहकारमंत्र्यांची लोकशाही आघाडी पालिका निवडणूक स्वबळावर लढणार

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 25 जून 2021

वेगवेगळ्या विचारांचे व पक्षाचे स्थानिक नेत्यांचा आघाडीत सहभाग आहे. आघाडी पूर्ण ताकदीने सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात काम करणार आहे.

कऱ्हाड : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पालिकेतील लोकशाही आघाडीत खांदेपालट झाला आहे. आघाडीच्या नवी कार्यकारणी मावळते अध्यक्ष सुभाष पाटील यांनी आज जाहीर केली. आघाडीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्याचे त्यांनी घोषित केले. ॲड.विद्याराणी साळुंखे, डॉ. सतिश शिंदे असे दोन उपाध्यक्ष आहेत. आघाडी पूर्ण ताकदीने सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात काम करणार असून आगामी निवडणूक स्वबळावर लढणार आहे, असेही घोषित केले.

नरेंद्र पवार यांची सचिव, मुस्सदिक अंबेकरी यांची सहसचिव, रविंद्र मुंढेकर यांची खजिनदार तर राकेश शहा यांची सहखजीनदार आहेत. आघाडीत ५७ मार्गदर्शक तर ६४ संघटकांची निवड झाली आहे. लोकशाही आघाडीची कार्यकारिणीच्या अध्यक्षपदाची घोषणा लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील यांनी जाहीर केली.

हेही वाचा : एका नेत्याने चक्रे फिरवली आणि साई संस्थानची तयार झालेली यादी रखडली...

वेगवेगळ्या विचारांचे व पक्षाचे स्थानिक नेत्यांचा आघाडीत सहभाग आहे. आघाडी पूर्ण ताकदीने सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. आगामी निवडणुक स्वबळावर लढणार आहे, असेही घोषित केले. आघाडीच्या नव्या कार्याकारणीत सुभाष पाटील यांच्यासह शहरातील विविध लोकांचा मार्गदर्शक म्हणून समावेश आहे.

आवश्य वाचा : डाॅ. लहामटे का म्हणाले, मी पळपुटा आमदार नाही

मुकुंद कुलकर्णी, अशोकराव डुबल, संभाजी सुर्वे, विलास कुंभार, कमलाकर कांबळे, दीपक बेलवणकर, बाबासाहेब भोसले, बबनराव भोजगावंकर, नंदकुमार बटाणे, जगन्नाथ माने, भाऊसाहेब शिंदे, हेमंत ठक्कर, शरद मुंढेकर, महंमद चाँद बागवान, उदय हिंगमिरे यांचा समावेश आहे.  आघाडीच्या संघटकपदी संघटक सौरभ पाटील यांची निवड झाली आहे. त्यांसोबत ६४ संघटकांची निवड जाली आहे. त्यात आजी माजी नगरसवेकांसह विविध पक्षातील युवकांचाही समावेश आहे.

मार्गदर्शकांमध्ये महादेव पाटील, इसाक सवार, शौर्यशिल खामकर, संजय पवार, गंगाधर जाधव, सुरेश शेजवळ, ॲड. सतीश पाटील, ॲड. प्रताप पाटील,सौ. उमा हिंगमिरे, श्रीमती अरुणा जाधव, सौ सुनंदा शिंदे,सौ. अनिता पवार, सौ पल्लवी पवार, जयंत बेडेकर, गजानन फल्ले, राजेंद्र माने, राजीव मोहिते, अब्दुल सुतार ,चंद्रकांत पाटील, प्रमोद थोरवडे, आनंदराव शिंदे, विजय कांबळे, अनिल वाघमारे, सुनिल पवार, राजेंद्र मेहता, अर्जुन पवार, इकबाल मुजावर, रमेश सातुरे, रामभाऊ शेलार, राजेंद्र काटवटे, शामराव मुळे, राजेंद्र शहा, संजय तवटे, प्रकाश वास्के, अख्तर आंबेकरी, रामभाऊ शिंदे, दाऊद आंबेकरी, अहमंद मुल्ला, अभिजीत सूर्यवंशी, श्रीधर मुळे, लक्ष्मण चव्हाण, आनंदा चौगुले, अमृत देशपांडे यांचा समावेश आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख