खराब हवामानामुळे सातारा दौरा रद्द; उद्धव ठाकरे ही म्हणाले, मी पुन्हा येईन.... - CM's visit to Satara canceled due to bad weather-ub73 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

खराब हवामानामुळे सातारा दौरा रद्द; उद्धव ठाकरे ही म्हणाले, मी पुन्हा येईन....

सचिन शिंदे
सोमवार, 26 जुलै 2021

मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उतरू न शकल्याने हा दौरा रद्द झाल्याचे शासकिय सुत्रांनी सांगितले. मात्र, दौरा रद्द झाल्याचे अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने सर्व अधिकारी पावसातच मुख्यमंत्र्यांची वाट पहात थांबले होते. सध्या कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. 

कऱ्हाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर दौऱ्यावर होते. हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टर परत पुण्याकडे रवाना झाले आहे. जोराचा पाऊस, वारा व ढगाळ वातावरणाने दौरा रद्द झाल्याचे शासकीय सुत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याला ढगाळ वातवरणाचा फटका बसला आहे.

मात्र, हेलिकॉप्टर पुण्याकडे परत फिरले असले तरी दौरा रद्द झालेला नाही. असे शासकिय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.  त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा दौऱ्यावर येणार आहेत.  

हेही वाचा : अतिवृष्टीत निराधार झालेल्या आजीला राज्यमंत्र्यांनी दिला आधार!

मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने सकाळपासूनच सर्व विभागांचे अधिकारी कोयनेत ठाण मांडून बसले होते. हेलिकॉप्टर कोयनेत आले व घिरट्या घालू लागले.मात्र, खराब हवामानामुळे ते उतरू न शकल्याने हा दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दौरा रद्द झाल्याचे अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने सर्व अधिकारी पावसातच मुख्यमंत्र्यांची वाट पहात थांबले होते.

सध्या कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, हेलिकॉप्टर पुण्याकडे परत फिरले असले तरी दौरा रद्द झालेला नाही. असे शासकिय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.  त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा दौऱ्यावर येणार आहेत.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख