कोयनानगर येथे पोलिस प्रशिक्षण उपकेंद्राला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

प्रकल्प सुरु करण्यासाठी कोयना प्रक्ल्पाने रस्ते, वीज, पाणी, इमारती या आवश्यक असणाऱ्या बाबी भाडेतत्वावर गृह विभागाला उपलब्ध करुन द्याव्यात. या वसाहतीची देखभाल व दुरुस्ती गृह विभाग करुन हे केंद्र तात्पुरते चालु करेल. इमारत उभारणी झाल्यावर स्वतःच्या जागेत हे केंद्र स्थलांतरित होईल.
CM gives green light to police training sub-center at Koynanagar
CM gives green light to police training sub-center at Koynanagar

कोयनानगर : कोयनानगर येथे पोलिस प्रशिक्षण उपकेंद्रांच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला आहे. या उपकेंद्रासाठी 65 एकर जागा लागणार आहे. जलसंपदा विभागाचा कोयना प्रकल्प व महसुल विभागाकडे वापरात नसलेल्या जागा हस्तांतरीत कराव्यात. तेथे पोलिस प्रशिक्षण उपकेंद्र उभे राहणार आहे.

दरम्यान, प्रशिक्षण केंद्र उभे राहत नाही तोपर्यंत कोयना प्रकल्पाच्या वापराविनाअसलेल्या वसाहती भाडेतत्वावर तातडीने वर्ग कराव्यात, अशा सुचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.गृह विभागातर्फे येथे पोलिस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे.

प्रस्तावित प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागा पहाणी गृहराज्यमंत्री देसाई यांनी येथे भेट देवून पहाणी केली. यावेळी बैठकही झाली. त्यावेळी त्यांनी वरील सुचना दिल्या. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, कोयना प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, प्रांतधिकारी श्रीरंग तांबे, सहायक
वनसंरक्षक सुरेश साळुंखे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकात माळी, कोयना प्रकल्पाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव फाळके उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयना दौऱ्यावर आले होते. त्यावेळी या प्रकल्पाबाबत कल्पना दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी तातडीने आराखडा तयार करा. प्रकल्प नव्याने उभारणीसाठी 65 एकर जागा लागणार आहे.

ती जागा कोयना प्रकल्पाने तातडीने द्यावी. म्हणजे हा बहुउद्देशीय प्रकल्प उभारणीसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतुद करता येणार आहे. प्रकल्प सुरु करण्यासाठी कोयना प्रक्ल्पाने रस्ते, वीज, पाणी, इमारती या आवश्यक असणाऱ्या बाबी भाडेतत्वावर गृह विभागाला उपलब्ध करुन द्याव्यात. या वसाहतीची देखभाल व दुरुस्ती गृह विभाग करुन हे केंद्र तात्पुरते चालु करेल. इमारत उभारणी झाल्यावर स्वतःच्या जागेत हे केंद्र स्थलांतरित होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com