56 जणांचा सीएम, 54 चा उपमुख्यमंत्री आणि 44 चा महसूलमंत्री : चंद्रकांतदादांचे गणित

गणपतीत गर्दी वाढली तर पुन्हा लॉकडाउनचा इशारा उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी दिलाय, या विषयी ते म्हणाले, तिसऱ्या लाटेची काळजी घेऊन काम केले पाहिजे. नियमांचे पालन करून जनजीवन थांबवता येणार नाही.पण पवार साहेब तुमचे सर्व ठिक चालले आहे, अंबानीच्या कारखान्यात हेलिकॉप्टरने उतरता. सगळ्या सोयी सुविधा तेथे तुम्हाला मिळतात. तुमचे बरे चाललंय आहे.
56 जणांचा सीएम, 54 चा उपमुख्यमंत्री आणि 44 चा महसूलमंत्री : चंद्रकांतदादांचे गणित
CM of 56, Deputy Chief Minister of 54 and Revenue Minister of 44: Mathematics of Chandrakantdada

जालना : ५६ आमदारांचा मुख्यमंत्री, ५४ जणांचा उपमुख्यमंत्री, ४४ जणांचा महसूलमंत्री असे सरकार झाले, अशा विश्वासघातक्यांसोबत आम्हाला काम करायचे नाही. भाजप यापुढे पालिकेपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका प्रामाणिक पक्षांना सोबत घेऊन एकट्याच्या जीवावर लढणार आहे. शिवसेनेने आमचा विश्वासघात केलेला आहे, त्यामुळे भाजप यापुढे एकट्याच्या ताकदीवर लढणार आहे, असे स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व्यक्त केले. CM of 56, Deputy Chief Minister of 54 and Revenue Minister of 44: Mathematics of Chandrakantdada

पाटील हे जालना दौऱ्यावर असून तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी निवडणुकांबाबत विचारले असता ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष स्वतःच्या पायावर मजबूत होत चालला असून एक जबरदस्त संघटन उभे राहात आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार पाच वर्षे उत्तम राज्य चालले. त्या आधारे शिवसेनेने मते मागितली. निवडणुकीनंतर ५६ आमदारांचा मुख्यमंत्री, ५४ जणांचा उपमुख्यमंत्री, ४४ जणांचा महसूलमंत्री असे सरकार झाले. अशा विश्वासघातक्यांसोबत आम्हाला काम करायचे नाही. 

भाजप पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणूका प्रामाणिक पक्षांना सोबत घेऊन एकट्याच्या जीवावर लढणार आहोत. सदाभाऊ खोत, रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, विनय कोरे असतील या सर्वांना बरोबर घेऊन लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येऊनही आम्ही जिंकलो आहोत. 

जावेद अख्तर यांनी तालिबानी ज्याप्रमाणे इस्लाम राष्ट्र आणण्याचे स्वप्न पाहतात. त्याप्रमाणे संघ आणि बजरंग दलाला पाठींबा देणारे हिंदू राष्ट्र आणायचे स्वप्न पहात आहेत, अशी टीका केली आहे. याविषयी विचारले असता श्री. पाटील म्हणाले, जावेद अख्तर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदू शब्द व हिंदू राष्ट्र कधीही कळलेले नाही. धर्मावर आधारीत राज्य ही संकल्पना संघाची नाही. तर संघाची धर्माची कल्पना हा व्यवहार आहे. हिंदू माणूस जो एकमेकांवर प्रेम करतो, दुसऱ्याच्या अडणचीत मदत करतो, एकमेकांना मोठे करण्यासाठी प्रयत्न करतो, अशांचा समुह म्हणजे हिंदू राष्ट्र होय. 

येथे प्रत्येकाला आपापली उपासणा पद्धती अवलंबण्याचा वाव आहे. हिंदूंनी कधीही कोणावर आक्रमण केलेले नाही. सर्व धर्मसमभाव ही संकल्पनाच मुळात हिंदूंची आहे. अशा प्रकारचे राष्ट्र आम्हाला अपेक्षित आहे. यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना चालणार आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे सकाळी आरती केली पाहिजे, सायंकाळी पूजा केली पाहिजे, अशी संकल्पना आमची नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांची महसूलमंत्री असतानाचे बनावट निकालपत्र तयार करून  हडपसर येथील सुमारे दोनशे कोटी रुपयांची जमीन लाटण्याच्या प्रकरणाबाबत ते म्हणाले, राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, महसूल मंत्र्यांच्या सही-शिक्क्यांची मंत्रालयातील नंबरसह ऑर्डर काढली जाते, तहसीलदार अंमलबजावणी करतात, किती बजबजपुरी माजलेली आहे, हे यातून दिसते. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर बोलण्याचे टाळले. विधान परिषदेवर नेमावयच्या १२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींचे नाव वगळले, यावर ते म्हणाले, महाविकास आघाडीने काय करायचे हे मी ठरवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

गणपतीत गर्दी वाढली तर पुन्हा लॉकडाउनचा इशारा उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी दिलाय, या विषयी ते म्हणाले, तिसऱ्या लाटेची काळजी घेऊन काम केले पाहिजे. नियमांचे पालन करून जनजीवन थांबवता येणार नाही. पण पवार साहेब तुमचे सर्व ठिक चालले आहे, अंबानीच्या कारखान्यात हेलिकॉप्टरने उतरता. सगळ्या सोयी सुविधा तेथे तुम्हाला मिळतात. तुमचे बरे चाललंय आहे.

सर्वसामान्यांना सण, उत्सव साजरे करावे लागतात. सर्वसामान्यांना संस्कृतीमध्ये माणसाला मशिनसारखे काही काळ बंद व काही काळ सुरू ठेवता येत नाही. त्याचा ठरलेला दिनक्रम आहे. त्यासाठी उत्सव, सण निर्माण झाले आहेत. एवढे सण कुठल्याही धर्मात नाहीत. हिंदू धर्मातील माणूस मनोरूग्ण कमी आहे, तो रूग्णालयात जाऊ शकत नाही. समाजाने त्याला नेहमी आनंदी ठेवण्याची ही साधने बनविली आहेत. त्यामुळे सण उत्सव साजरे करावे लागतील.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in