तर लोकं माझा कडेलोट करतील : उदयनराजे - Citizens will punish me, If i dont atained ShivJayanti programme says MP Udyanraje | Politics Marathi News - Sarkarnama

तर लोकं माझा कडेलोट करतील : उदयनराजे

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी सुध्दा लोकांची तळहातावरील फोडाप्रमाणे काळजी केली असती. सगळ्यांना जपण्याचे काम केले असते. त्यामुळे आपणही कोरोनाच्या काळात आपली काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत 19 फेब्रुवारीला अजिंक्यतारा किल्ल्यावर होणारी शिवगाण स्पर्धा होणारच आहे.

सातारा : कोणत्याही परिस्थितीत 19 फेब्रुवारीला अजिंक्यतारा किल्ल्यावर होणारी शिवगाण स्पर्धा होणारच आहे. सोशल डिस्टन्स पळून ही स्पर्धा होईल. या कार्यक्रमाला मी देखील उपस्थित राहणार असून नाही आलो तर लोक माझा कडेलोट करतील, अशी मिश्किल टिप्पणी साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. 

शिवजयंतीला जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, कोरोनात अनेकांनी जवळचे लोक गमवत आहोत. शिवाजी महाराज हे राज्याचीच नव्हेत तर संपूर्ण देशाची अस्मिता आहेत. त्यांची जयंती झाली पाहिजे. पण लोकांची काळजी करणे शासनासह आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी सुध्दा लोकांची तळहातावरील फोडाप्रमाणे काळजी केली असती. सगळ्यांना जपण्याचे काम केले असते. त्यामुळे आपणही कोरोनाच्या काळात आपली काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत 19 फेब्रुवारीला अजिंक्यतारा किल्ल्यावर होणारी शिवगाण स्पर्धा होणारच आहे.

सोशल डिस्टन्स पळून ही स्पर्धा होईल. या कार्यक्रमाला मी देखील उपस्थित राहणार असून नाही आलो तर लोक माझा कडेलोट करतील, अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली. आपण पांढरा शर्ट न घालता रंगीत शर्ट घातला आहे. 'व्हॅलेंटाईन डे' साठी स्पेशल आहे का, या प्रश्नावर त्यांनी ''हो स्पेशल आहे आणि तुम्ही म्हातारे झाला आहात, मी नाही,'' असे उत्तर दिले.

पवार नक्की लक्ष घालतील....

मराठा आरक्षणावर पवारांची भेट घेतली ते यामध्ये लक्ष घालणार का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, यापुढील बाबतीत जी काय चर्चा होणार आहे. मला खात्री आहे, ते यामध्ये नक्की लक्ष घालतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख