आरोप करून चर्चेत राहणे हेच चित्रा वाघांना काम.... - Chitra Wagh's job is to stay in the discussion by making allegations .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

आरोप करून चर्चेत राहणे हेच चित्रा वाघांना काम....

उमेश बांबरे
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

जिल्ह्यातील अनेक पोलिस दहा दहा वर्षे एकाच ठिकाणी एकाच विभागात कार्यरत आहेत, याकडे लक्ष वेधले असता सतेज पाटील म्हणाले, याविषयी मी पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे. एकला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असे होता कामा नये.

सातारा : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ कोणत्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेल्या हे सर्वांना माहिती आहे. काही तरी सनसनाखेज आरोप करून चर्चेत राहणे याच्या पलिकडे त्या काहीही काम करत नाहीत. आम्ही काय काम करतोय हे राज्यातील लोकांना माहिती आहे, त्यामुळे त्यासाठी भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अशी सडेतोड टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी साताऱ्यात केली. Chitra Wagh's job is to stay in the discussion by making allegations ....

दरम्यान, काँग्रेस पक्ष संपलेला नाही, गावागावात आजही काँग्रेस पक्षाचा विचार आजही आहे. आता नव्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना ताकद देण्याचे काम आम्ही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध शासकिय विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा : विजयदादांनी सूत्रे हाती घेतली आणि अकलूज नगरपरिषदेचा निर्णय झाला

जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष बॅकफुटला गेला असून त्याला ऊर्जितावस्था देणे गरजेचे आहे, याबाबत आपली भूमिका काय असणार आहे, या प्रश्नावर मंत्री सतेज पाटील म्हणाले, पक्ष संघटना वाढविणे ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण यादी घेऊन बसलो तर मागच्या पाच वर्षात आमच्यातील किती लोक दुसऱ्या पक्षात गेलेत, तीच काँग्रेसची ताकद होती. दुर्दैवाने आम्ही ज्यांना मोठे केले तेच आमच्यापासून लांब गेले. हे राजकारणात घडत असते.

आवश्य वाचा : एकनाथ खडसेंवर मी टीका करणार नाही; पण.... : आशिष शेलार

नवीन लोक तयार करणे पक्षाला उभारणी देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. काँग्रेस पक्ष म्हणून विचारधारा ही गावागावात निश्चितपणे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष संपलेला नाही. पक्षाची मते आणि पक्षाला मानणारा वर्ग निश्चितपणे गावागावात आहे. आता नव्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल काय, या प्रश्नावर ते म्हणाले, पाच वर्षे नव्हे २५ वर्षे शंभर टक्के टिकेल. 

राज्याला दोन गृहराज्यमंत्री आहेत. ते जनतेला माहितच नाहीत, अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे. मुळा त्यांना बोलायचा अधिकार आहे का हा प्रश्न आहे. त्या कोणत्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेल्या हे सर्वांना माहिती आहे. काही तरी सनसनाखेज आरोप करून चर्चेत राहणे याच्या पलिकडे त्या काहीही काम करत नाहीत. आम्ही काय काम करतोय हे राज्यातील लोकांना माहिती आहे, त्यामुळे त्यासाठी भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

शक्य असेल तेथे युती होणार....
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला स्वबळावर लढणे शक्य होणार आहे का, या प्रश्नावर सतेज पाटील म्हणाले, मुळात नाना पटोले यांच्या वाक्याचा विपर्यास केला गेला आहे. आम्ही अनेक ठिकाणी आघाडी करून निवडणूका लढलेल्या आहेत. तीन पक्ष एकत्रित लढल्याचे व जिंकल्याच विधान परिषदेच्या निवडणूकीत सर्व महाराष्ट्राने बघितलेले आहे.

शक्य असेल तेथे आघाडी होणार असून त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. पण हा निर्णय स्थानिक लोकांवर अवलंबून असून आता निवडणूका लांब असल्याचे त्यावर आताच चर्चा करणे योग्य नाही. ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी तीनही पक्षातील प्रमुख नेते मंडळी एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये कुठेही अडचण, मतभेद,
गैरसमज समज नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांच्या बदलीवरून जिल्ह्यात आत्महत्येचा प्रकार झालेला आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, मुळात दहा वर्षे ते सातारा शहरात कार्यरत होते. नियमाप्रमाणे त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांनी अशा पध्दतीने पाऊल उचलायला नको होते. त्यांचा मेडिकल रिपोर्ट येईल यामध्ये सर्व सत्य बाहेर येईल. जिल्ह्यातील अनेक पोलिस दहा दहा वर्षे एकाच ठिकाणी एकाच विभागात कार्यरत आहेत, याकडे लक्ष वेधले असता सतेज पाटील म्हणाले, याविषयी मी पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे. एकला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असे होता कामा नये. नियम सर्वांला सारखा लावला पहिजे, अशी सूचना मी त्यांना केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  

पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार....
अतिवृष्टी महापुराबाबत शासनाने काही ठोस उपाय योजना आखल्या आहेत काय, या प्रश्ना सतेज पाटील म्हणाले, २००५ चा पूर आला आणि २०१९ मध्ये
झालेली अतिवृष्टी पाहिली तर आता २०२१ मध्ये दरड कोसळण्याचा प्रकार नवीन आला आहे. पावसाची स्थिती बदली असून २४ तासात पाचशे ते आठशे
मिलिमीटर पाऊस पडतो. याला सामोरे कसे जायचे हा प्रश्न आहे. नुकताच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या भागाचा दौरा केलेला आहे.

त्यामध्ये दोघांचे म्हणणे होते की, आगामी पाच वर्षांचे नियोजन करणे गरजेचे आहे. हायवे, बंधारे याबाबत वडनेरे कमिटीच्या अहवालानुसार पुलांना भराव टाकण्याऐवजी   कमानी टाकणे, बंधाऱ्यात पाणी थांबण्याऐवजी त्यांचा निचरा योग्य पध्दतीने करणे हे महत्वाचे आहे. येणारा पाऊस आणि साठणारे पाणी याचे योग्यपध्दतीने नियोजन करण्याचे आवाहन आगामी काळात असणार आहे, त्यासाठी आम्ही आराखडा तयार करत आहोत. 

आरक्षणप्रश्नी केंद्राने पळ काढू नये....
मराठा आरक्षणप्रश्नाबाबत ते म्हणाले, या प्रश्नाबाबत केंद्राकडून बोलण्यापेक्षा कृती झाली पाहिजे. ते काय कृती करणार याकडे आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे दिल्लीत जाऊन सर्व खासदारांना भेटुन पत्र देऊन आलेले आहेत. या अधिवेशनात निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाला यातून पळ काढता येणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख