मुख्यमंत्र्यांचा संचारबंदीचा निर्णय क्रांतीकारक; टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा उघड - Chief Minister's decision to ban communication is revolutionary: Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचा संचारबंदीचा निर्णय क्रांतीकारक; टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा उघड

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीचा निर्णय क्रांतीकारक असा घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या निर्णयावरती भाजपा नेते टीका करत असल्याने त्यांचा तोकडेपणा व दळभद्रीपणा समोर आला असल्याची टीका श्री. चव्हाण यांनी केली आहे. 

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊन पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोकडेपणा व दळभद्रीपणा समोर आला आहे. केवळ आपण सरकार सोबत आहोत, असे म्हणत अंमलात आणलेल्या निर्णयावर राजकारण करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या नेत्यांवर केली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना, राज्याची तिजोरी मोकळी आहे. अशावेळी सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. मोदी सरकारने मागील लॉकडाऊनमध्ये धान्य वाटपाच्या रूपाने तुटपुंजी मदत केली होती. 

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीचा निर्णय क्रांतीकारक असा घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या निर्णयावरती भाजपा नेते टीका करत असल्याने त्यांचा तोकडेपणा व दळभद्रीपणा समोर आला असल्याची टीका श्री. चव्हाण यांनी केली आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख