विठ्ठलाच्या दरबारातही खुर्चीचा मोह सुटेना; मुख्यमंत्री जनतेचा पालक, गाडीचा चालक नव्हे.... - Chief Minister is the guardian of the people, not the driver of the car .... | Politics Marathi News - Sarkarnama

विठ्ठलाच्या दरबारातही खुर्चीचा मोह सुटेना; मुख्यमंत्री जनतेचा पालक, गाडीचा चालक नव्हे....

विजय पाटील
बुधवार, 21 जुलै 2021

श्री. पडळकर म्हणाले, पण पाच वेळा उच्च न्यायालयाने तंबी देऊनसुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करतंय. 

सांगली : मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो. गाडीचा चालक नाही. पण त्यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नातर्तेपणामुळं रद्द झाले, असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. Chief Minister is the guardian of the people, not the driver of the car ....

सांगलीच्या आटपाडीमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार पडळकर म्हणाले, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत या ठाकरे सरकाने ज्या पद्धतीनं फक्त तारखावर तारखा मागितल्या आणि नाईलाजास्तव यांच्या नातर्तेपणामुळं न्यायालयाला ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करावं लागलं. आज तोच नाकर्तेपणा करत जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे 'कोविड वॅारीयर' यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालेले आहेत.

हेही वाचा : काँग्रेसमध्ये उभी फूट..सिद्धूंकडे 62 तर कॅप्टन यांच्याकडे 15 आमदार

सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसल आहे. खरं तर मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो. गाडीचा चालक नाही. पण, त्यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

आवश्य वाचा : काँग्रेसचे नेतृत्व 2024 पर्यंत सोनिया गांधीच करणार अन् तरुण चेहऱ्यांवर महत्वाची जबाबदारी?

केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे, असे सांगून श्री. पडळकर म्हणाले, पण पाच वेळा उच्च न्यायालयाने तंबी देऊनसुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करतंय. 

जपाचे निमित्त झोपेचा पसर 

देहाचा विसर पाडूनिया॥ 

ऐसे ते भजन अमंगळवाणी 

सोंग संपादनी बहुरूप्याची॥

सेवेसी विकळ देहाचिये आसे 

तया कोठे असे देव उरला॥

तुका म्हणे मानदंभ जया चित्ती

तयाची फजिती करू आम्ही॥

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख