चंद्रकांतदादांचे वक्तव्य नैराश्येतूनच : जयंत पाटील 

ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे जाणार नाही याची सगळ्यांना खात्री झाली आहे. त्यामुळेच पोलिसांवरही आता राग व्यक्त करायला लागले आहेत.
चंद्रकांतदादांचे वक्तव्य नैराश्येतूनच : जयंत पाटील 
Chandrakantdada's statement out of frustration: Jayant Patil

सांगली : महाविकास आघाडीचे सरकार आता पाच वर्ष जाणार नाही, याची खात्री झाल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पोलिसांवरही राग व्यक्त करायला लागलेत. ते नैराश्यातून असे वक्तव्य करत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. Chandrakantdada's statement out of frustration: Jayant Patil

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत भाजप जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यांनी गुंड आणि पोलिसांच्या बळावर राज्य सरकारची दडपशाही सुरू असल्याचे म्हटले होते. या आरोपाला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीत पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांवर टीका केली.  

ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे जाणार नाही याची सगळ्यांना खात्री झाली आहे. त्यामुळेच पोलिसांवरही आता राग व्यक्त करायला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. कोणतीही गुंडगिरी कुठेही, कधीही झालेली नाही आणि पोलिस त्यांचे काम करत आहेत. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे योग्य नाही. मात्र पोलिस आणि अधिकारी यांचे ऐकत नाहीत. त्यामुळेच नैराश्यातून चंद्रकांतदादा असे वक्तव्य करत आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी मारला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in