चंद्रकांत पाटलांचे ते विधान हास्यास्पद : पृथ्वीराज चव्हाण - Chandrakant Patil's statement is ridiculous Says Congress Leader: Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटलांचे ते विधान हास्यास्पद : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  भाजपच्या नेत्यांना कदाचित विसर पडला असेल. ५०-६० वर्षापासूनची मागणी असूनही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर १४ जुलै २०१४ साली मराठा आरक्षणाचा कायदा पास केला. मी मराठा आरक्षणाचा अध्यादेश मांडल्या बरोबर कोर्टात आवाहन दिले गेले.

सातारा : काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील काही बड्या नेत्यांना मराठा आरक्षण नको होतं, असा गौप्यस्फोट केला होता. याला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, चंद्रकांत पाटलांचे ते विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्याचे ते विधान हास्यास्पद आहे. आमच्यातील मराठा नेत्यांना आरक्षण नको असते, तर आमच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी हा अध्यादेशच पारितच केला नसता, अशी पुष्टीही श्री. चव्हाण यांनी जोडली आहे. 
 
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यावर भाजप नेत्याकडून महाविकास आघाडी सरकारवर सतत टीका होतं आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडले असल्याची टीका भाजप करत आहे.

यावर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  भाजपच्या नेत्यांना कदाचित विसर पडला असेल. ५०-६० वर्षापासूनची मागणी असूनही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर १४ जुलै २०१४ साली मराठा आरक्षणाचा कायदा पास केला. मी मराठा आरक्षणाचा अध्यादेश मांडल्या बरोबर कोर्टात आवाहन दिले गेले.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे सरकार ३१ ऑक्टोबर २०१५ आले. तोपर्यंत ही बाब न्यायप्रविष्ठ होती. त्यांच्या वकिलांनी मराठा आरक्षणासाठीची बाजू काही व्यवस्थित मांडली नाही आणि १४ नोव्हेंबरला कोर्टाने माझ्या अध्यादेशाला स्थगिती दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जो अध्यादेश मांडला होता, तोच अध्यादेश तसाच कोणताही पूर्णविराम, स्वल्पविराम न बदलता विधेयक म्हणून भाजपने जानेवारी २०१५ मध्ये पारित केले होते. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख