महाराष्ट्रात लोकशाहीचे नव्हे; ठोकशाहीचे राज्य : चंद्रकांत पाटील यांची टीका - Chandrakant Patil criticizes Thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रात लोकशाहीचे नव्हे; ठोकशाहीचे राज्य : चंद्रकांत पाटील यांची टीका

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

शिवजयंतीला बंदी आणि सत्तेतील सहभागी एका पक्षाचा राज्याध्यक्ष हजारोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढतो. त्याला बंदी नाही आणि शिवजयंतीला कशी?'' कोरोनाचे कारण सांगत अधिवेशन लांबवायचे सरकारचे प्रयत्न असून आम्ही उपस्थित करणाऱ्या प्रश्‍नांना ते घाबरत असल्याची टीकाही श्री. पाटील यांनी यावेळी केली. 

सातारा : लोकशाहीचे नव्हे तर ठोकशाहीचे हे राज्य असून राज्यातील नामांकित व्यक्‍तींना केस करण्याची भिती दाखविण्यात येत आहे. हे राज्य तुमच्या घरचे नव्हे तर कायद्याचे आहे. लोक आता मतदानाची वाट बघत असून भ्रमात राहू नका, सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे राज्य सरकारला दिला.

दरम्यान, कोरोनाचे कारण सांगत अधिवेशन लांबवायचे सरकारचे प्रयत्न असून आम्ही उपस्थित करणाऱ्या प्रश्‍नांना ते घाबरत असल्याची टीकाही श्री. पाटील यांनी केली. जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती. जनतेच्या मतांचा अनादर करत तुम्ही सत्तेत बसला आहे. येत्या निवडणूकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, अशी टिकाही त्यांनी केली.

 अजिंक्‍यतारा किल्ल्याची खासदार उदयनराजेंसोबत पाहणी केल्यानंतर श्री. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने भाजपने हजारो गावांत शिव स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यापैकीच शिवगाण हा स्पर्धा हा कार्यक्रम आहे.

हिंदुह्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी मोठा त्याग करत अजानसह इतर स्पर्धा आयोजित केल्या. शिवजयंतीला बंदी आणि सत्तेतील सहभागी एका पक्षाचा राज्याध्यक्ष हजारोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढतो. त्याला बंदी नाही आणि शिवजयंतीला कशी?'' कोरोनाचे कारण सांगत अधिवेशन लांबवायचे सरकारचे प्रयत्न असून आम्ही उपस्थित करणाऱ्या प्रश्‍नांना ते घाबरत असल्याची टीकाही श्री. पाटील यांनी यावेळी केली. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख