केंद्राचे कृषी कायदे शेतकरी हिताचे; पटोलेंच्या राज्य सरकारने काय दिले : गिरीश महाजन यांचा हल्ला

केंद्राला नावे ठेवणाऱ्या पटोले यांनी राज्यातील त्यांचे सरकार शेतकऱ्यांना काय देते हे सांगावे, शेतकऱ्यांचे वादळी पावसाने नुकसान झाले, खानदेशतील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यांना अद्याप एक पैसाही भरपाई दिली नाही.
केंद्राचे कृषी कायदे शेतकरी हिताचे; पटोलेंच्या राज्य सरकारने काय दिले : गिरीश महाजन यांचा हल्ला
Centre's agricultural laws are in the interest of farmers; What did Patole's state government give: Girish Mahajan's attack

जळगाव : केंद्रातील भाजप सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत. उलट राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले हे सांगावे असा टीका भाजप नेते आमदार गिरीश महाजन Girish Mahajan यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्यावर केली आहे. Centre's agricultural laws are in the interest of farmers; What did Patole's state government give: Girish Mahajan's attack

नाना पटोले आज जळगाव जिल्ह्यात होते. त्यांनी फैजपूर येथे केंद्राच्या तीन कृषी कायद्याची होळी केली, तसेच केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याची टीका केली होती. यावर भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पटोले यांच्यावर टीका केली. महाजन म्हणाले, काँग्रेस पक्षाचे काय राहिले आहे, त्या पश्चिम बंगालमध्ये पार सुपडासाफ झाला, तरी यांच्या वल्गना सुरूच असतात. 

केंद्राला नावे ठेवणाऱ्या पटोले यांनी राज्यातील त्यांचे सरकार शेतकऱ्यांना काय देते हे सांगावे, शेतकऱ्यांचे वादळी पावसाने नुकसान झाले,  खानदेशतील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यांना अद्याप एक पैसाही भरपाई दिली नाही.  शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा देत नाही, त्यांच्या मालाला चांगला हमी भाव देत नाही, आज राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत.

मात्र सरकारमध्ये असूनही काँग्रेस त्यांच्यासाठी काहीही करत नाही. परंतु केंद्र सरकारच्या नावाने मात्र हे कायम ओरड करीत असतात. केंद्र सरकारने कृषी कायदे करून शेतकरी हित जोपासले आहे. २०२४ मध्ये जनता पुन्हा मोदी यांनाच जनता निवडून देईल. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाची स्थिती काय असेल हे पश्चिम बंगालमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे पटोले यांनी उगाच मोदी सरकारवर टीका न करता राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मदत करावी, असे आव्हानही त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in