राज्यातील यंत्रणांच्या कामात केंद्राचा हस्तक्षेप; अधिकारावर येतेय गदा... - Central interference in the functioning of state institutions; The hammer falls on the right | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यातील यंत्रणांच्या कामात केंद्राचा हस्तक्षेप; अधिकारावर येतेय गदा...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कागल चेकनाका येथे भेट देऊन पाहणी केली. कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांची आणि प्रवाशाची कशाप्रकारे तपासणी केली जाते याची पहाणी करून पोलिसांना सूचना केल्या आहेत.

कोल्हापूर : केंद्र सरकार राज्यातील यंत्रणांच्या कामात वारंवार हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे राज्याच्या अधिकारावर गदा येत असल्याचा घणाघात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केला आहे. 

दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेल्या बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी शंभूराजे देसाई कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. मंत्री देसाई म्हणाले, केंद्राच्या या भूमिकेमूळ राज्याच्या स्वायत्ततेवर मर्यादा येत आहेत. जनतेनं आणि भक्तांनी सहकार्य केल्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यश आले आहे.

दरम्यान त्यांनी बंद असलेल्या जोतिबा मंदिर परिसरातील शिखराचे बाहेरुनच दर्शन घेतले. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कागल चेकनाका येथे भेट देऊन पाहणी केली. कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांची आणि प्रवाशाची कशाप्रकारे तपासणी केली जाते याची पहाणी करून पोलिसांना सूचना केल्या आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख